शिवशाही ब्रेक फेल चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली

Khozmaster
1 Min Read

मुर्तीजापुर प्रतिनिधी:

मुर्तीजापुर बस स्थानकात आज प्रवाशांनी भरलेली बस आली आणि प्रवाशांसह नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला.अकोला आगार क्रमांक दोनची शिवशाही बसचा अचानकपणे ब्रेक निकामी झाल्यामुळे बस स्टँड परिसरात उभी असलेल्या शिवशाही बसला पाठीमागून धडकल्याचा अपघात घडला.

 

आज दुपारी एक वाजताच्या सुमारास एम एच ०६ बी डब्ल्यू ४३१९ अकोला आगार क्रमांक 2 ची शिवशाही मूर्तिजापूर बस स्थानकात आली असता अचानक ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येतात ड्रायव्हरने अत्यंत सावधगिरीने आणि प्रसंगावधान राखून गाडी अतिशय काळजीपूर्वक समोर उभी असलेल्या बुलढाणा नागपूर क्रमांक एम एच ०६ बी डब्ल्यू ३५८७ शिवशाही बसला धडकवली.या थरारमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र यावेळी दोन्ही शिवशाही बसचे नुकसान झाले.हाच अपघात राष्ट्रीय महामार्गावर झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता.

यावेळी आगार प्रमुख प्रविण अंबुलकर, ए डब्ल्यू एस अनिल मानके,संतोष घोगरे व वाहतूक नियंत्रक आ.बी. सोळंके उपस्थित होते.परंतु सदर घटनेच्या वेळी बस स्थानकावर पोलीस चौकी असून कोणीही पोलीस कर्मचारी हजर नव्हते.

 

0 9 4 6 9 9
Users Today : 49
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *