कार्यकारी अभियंता कुंभकर्ण झोपेत प्रशासनाचा लाखो करोडो रुपये निधी भ्रष्टाचाराच्या मार्गाने जाणार

Khozmaster
2 Min Read

हिंगोली– जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाची जुनी इमारत आहे ती इमारत जुनी झाल्यामुळे प्रशासनाने नवीन इमारतीचे उद्दिष्ट ठेवून नवीन इमारत ही अत्याधुनिक सुविधा तसेच चांगल्या दर्जाची बनवावी याकरता प्रशासनाने तीन कोटी 99 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहेया निधीचे टेंडर जय भोले कंट्रक्शन पुसद या ठेकेदारांनी घेतले आहे परंतु सदरील इमारतीचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून या संदर्भामध्ये मागील महिन्यामध्ये उप आयुक्त आदिवासी विभाग अमरावती तसेच कार्यकारी अभियंता अमरावती यांना कळमनुरी येथील आदिवासी प्रकल्प इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत निवेदन दिले होते परंतु आजपर्यंत संबंधित ठेकेदारावर कुठल्याच प्रकारची कार्यवाही झालेली नाही आज रोजी सदरील कामाची पाहणी केली असता सदरील काम हे जुन्याच पद्धतीने चालू असून त्यामध्ये निकृष्ट दर्जाच्या विटा तसेच गजलेल्या अवस्थेत असलेला स्टील तसेच माती मिश्रीती रेती व खडक तसेच पांढऱ्या दगडापासून बनवलेली गीटी टू ग्रेट सिमेंट अशा निकृष्ट दर्जाच्या साहित्य व सामग्रीचा वापर सदरील इमारतीमध्ये होत आहे.सदरील इमारतीचे काम हे चांगल्या दर्जाचे होणे करिता प्रशासनाने भरीव असा निधी उपलब्ध करून दिला आहे परंतु सदरील निधीचा गैरवापर होत असून याबाबत कार्यकारी अभियंता आहे दुर्लक्ष करत असल्याचे बाब वेळोवेळी निदर्शनास येत आहे संबंधित संबंधित बांधकामाच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची क्वालिटी कंट्रोल किंवा इतर तपासणी बाबत मशीन उपलब्ध नाही तसेच सदरील कामाकडे कुठल्याच प्रकारचे उपअभियंता किंवा कार्यकारी अभियंता यांचे लक्ष नाही याबाबत माननीय आदिवासी मंत्री यांना सुद्धा आम आदमी पक्षाचे तालुकाप्रमुख बालाजी देशमुख यांनी सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून समिती नेमावी याकरिता निवेदन दिले आहे जय भोले कंट्रक्शन यांना तात्काळ यांच्याकडून काम काढून दुसऱ्या ठेकेदारास काम देण्यात यावे जेणेकरून शासनाचा लाखो करोडो रुपये निधी हा ठेकेदाराच्या खिशामध्ये जाणार नाही

 

0 9 3 7 4 4
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *