बुलडाणा : (खोज मास्टर) अकील शाह – जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 14 मार्च 2023 पासून बेमुदत संप पुकारला असून, या संपात जिल्हयातील हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. दरम्यान या संपामुळे जिल्हयातील विविध शासकीय कार्यालये जस-जसे संप वाढत आहे, तस-तसे सरकारी कार्यालय ओस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु शासकीय कर्मचारी व सरकारच्या या संघर्षामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. शेतकरी, विदयार्थी आणि विविध योजनांच्या लाभार्थींची कामे खोळंबली आहेत.
स्थानिक प्रशासकीय इमारत परिसरातील कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधी विविध घोषणा बाजी करत परिसर दणाणून सोडला होता. जुनी पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, आमदार, खासदार तुपाशी कर्मचारी मात्र उपाशी, जो पर्यन्त पेन्शन नाही तो पर्यंत कामावर नाही अश्या घोषणा कर्मचाऱ्यांनी दिल्या. या सर्व बाबीवरून लक्षात येते की, कधी नव्हे ती एकता या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दिसून येत आहे.
Users Today : 0