बरफगाव येथे राज्यस्तरीय वारकरी परिषदेची जय्यत तयारी..

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा

बागेश्वर धाम चे धीरेंद्र शास्त्री व प्रदीप मिश्रा महाराज यांच्यावर नियमानुसार कारवाई करून महाराष्ट्रात बंदी घालावी यासह पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांसाठी 17 मार्च 2023 रोजी बरफगाव येथे राज्यस्तरीय वारकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर वारकरी परिषदेची तयारी पूर्ण झाली असून दोन एकरामध्ये भव्य आयोजन करण्यात आले आहे.  राज्यस्तरीय वारकरी परिषद वारकरी भूषण हभप वासुदेव महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेत तर जुना आखाड्याचे महामंत्री परमपूज्य श्रीश्रीश्री रामभारती महाराज, गुरुदेव सेवा मंडळाचे गुरुजी, शिवगिरी महाराज घाटनांद्रा आश्रम, हिंदू आणि हिंदुत्वाचे अभ्यासक सुप्रसिद्ध व्याख्याते, अविनाशदादा काकडे नागपूर, मा. मंत्री गुलाबराव गावंडे, विश्व वारकरी संघटनेचे उपाध्यक्ष रामभाऊ झांबरे, वारकरी परिषदेचे मुख्य संयोजक ॲड. सतीशचंद्र रोठे, हभप दादा महाराज पाटील जय श्रीराम आश्रम, हभप सोपान महाराज येरळीकर,शेतकरी नेते रविकांत तुपकर, गजानन दादा अमदाबादकर, बुलढाणा अर्बन परिवाराचे सीईओ डॉ.सुकेश झंवर,मराठा सेवा संघ संलग्नित तानुबाई बिर्जे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विचारवंत गणेश निकम केळवदकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष टाले सर, नाट्य कलावंत साहित्यिक शशिकांत इंगळे, जगप्रसिद्ध चित्रकार विचारवंत भाई गजेंद्र आवारे ,यांच्यासह महाराष्ट्रातील वारकरी संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी, आश्रमांचे मठाधिपती, कीर्तनकार ,प्रवचनकार, विचारवंत, प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

0 9 3 7 4 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *