महेंद्र हिवाळे )
चिखली-: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुका म्हणजे जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून चिखली ची ओळख . शिक्षकांच्या उन्नतीसाठी समविचारी शिक्षक एकत्र येऊन 1996 साली दि चिखली तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था म.चिखली रजिस्टर नंबर 422 ची स्थापना समविचारी शिक्षकांनी व शिक्षकांच्या उन्नतीसाठी स्थापन केली होती शिक्षण पतसंस्थेचा 27 वर्षाचा कार्यकाल झाला आहे त्यामध्ये सुरुवातीचे अध्यक्ष हे बारा वर्षे होते त्यानंतर अध्यक्ष बदल होऊन2008साली नवीन अध्यक्षाची निवड झाली सदर अध्यक्ष यांनी शिक्षक यांच्या व्यतिरिक्त अधिकारी व्यवसायिक व जवळचे मित्र यांनी करोडो रुपये नियमबाह्य या दि चिखली तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित चिखली रजिस्टर नंबर 422 तालुका चिखली या संस्थेमध्ये ठेवीच्या स्वरूपात जमा केले आहे यामध्ये चिखली तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सभासद असलेले सदस्य यांनी माननीय गव्हर्नर रिझर्व बँक ऑफ इंडिया निर्देशक सक्तवसुली संचालक मुंबई आयकर आयुक्त मुंबई पोलीस उपाधीक्षक लाचलोचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा उपाधीक्षक आर्थिक गुना शाखा बुलढाणा जिल्हा उपनिबंधक बुलढाणा व सहाय्यक निबंध चिखली यांच्याकडे एका पत्राद्वारे तक्रार अर्ज सादर केला आहे त्यामध्ये त्यांनी असे नमूद केले आहे की दि चिखली तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित चिखली रजिस्टर नंबर 422 तालुका चिखली या संस्थेमध्ये व्यापारी व्यावसायिक अधिकारी यांनी काळा पैसा पतसंस्थेमध्ये ठेवल्या प्रकरणी पतसंस्थेची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत तक्रार अर्ज संस्थेचे काही सभासद यांनी केला आहे. शिक्षक यांचे हित जोपासण्यापेक्षा अधिकारी व्यापारी व इतर मंडळीचे हित अध्यक्ष जोपासत असल्याचे तक्रारी मध्ये नमूद केले आहे . पतसंस्था ही पगारदार शिक्षकांची असुन चिखली तालुक्या पुरती पुरती मर्यादित आहे असे असताना पतसंस्थेचे अध्यक्ष यांनी याव्यतिरिक्त अधिकारी व्यवसायिक व इतरांना मात्र सभासद करत येत नसताना रजिस्टर नंबर 422 या पतसंस्थेमध्ये काहींना बचत खाते न उघडताना मात्र सभासद करून घेतले तर काहीच्या कोणत्याही प्रकारचे सदस्य नसताना त्यांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी नियमबाह्यरित्या पतसंस्थेत ठेवलेले आहेत सदर ठेवलेली बेनामी काळा पैसा अध्यक्षाच्या सहमतीने पतसंस्थेमध्ये लपवण्याचा प्रकार सरासपणे गेल्या पंधरा वर्षापासून पतसंस्थेमध्ये सुरू आहे मोठ्या प्रमाणात बेनामी काळा पैसा हा शिक्षक व्यतिरिक्त अधिकारी व्यावसायिक व इतरांनी नाममात्र सभासदांनी रजिस्टर क्रमांक 422 या पतसंस्थेमध्ये नियम बाह्य ठेवलेला आहे आपण मागील पंधरा वर्षाच्या संपूर्ण कागदपत्राची तपासणी केल्यानंतर आपल्या लक्षात येईल एकंदरीत मोठ्या प्रमाणात शिक्षक व्यतिरिक्त अधिकारी व्यवसायिक व नामात्र सभासदांची बेनामी पैसा रजिस्टर नंबर 422 या पतसंस्थेमध्ये असून त्या त्यामुळे शासनाचा करोडो रुपयाचा आयकर बुडाला आहे संस्थेच्या पंधरा वर्षाचा बँक व पतसंस्था मधील खाते पडताळणी व आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यात यावी सदर बेनामी काळा पैसा करोडो रुपये उघडकीस आणायचे असेल तर आपण आपल्या यंत्रणेमार्फत सदर पतसंस्थेची चौकशी करावी व संपूर्ण बचत खाते रजिस्टर ठेवी खाते रजिस्टर व लेझर व इतर सर्व कागदपत्रे ताब्यात घ्यावी
ठेवीची संख्या पुढील प्रमाणे सन 2015 मध्ये 276 लाख रुपये सन 2016 मध्ये 477 लाख रुपये 2017 मध्ये 514 लाख रुपये 2018मध्ये 657 लाख रुपये सन 2019 मध्ये 777 लाख रुपये सन 2020 मध्ये 1030लाख रूपये 2021 मध्ये 1307लाख 2022 मध्ये 1555लाख रुपये अशाप्रकारे करोडो रुपयाची ठेवी व्यवसाय सभासदांनी रजिस्टर नंबर 422 पतसंस्थेमध्ये लपवलेल्या आहेत संस्थेचा कारभार हा शासन नियमाप्रमाणे चालत नाही तरी सविनय विनंती की दि चिखली प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित चिखली रजिस्टर नंबर 422 मधील करोड रुपयाची ठेवीची आपल्या यंत्रणेमार्फत सकुंल चौकशी करून तत्कालीन पतसंस्था अध्यक्ष यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी सदर अर्जावर सुभाष जयराम खेडेकर राजेश प्रतापराव ठेंग प्रदीप मधुकर अपार रवींद्र रघुनाथ नादरकर उद्धव तुकाराम परिहार सुनील एकनाथ धंदर रामानंद वामनराव सीताफळे देविदास लालसिंग बडगे शरद त्रंबकराव बंगाळे यांच्या तक्रार अर्जावर सह्या आहेत
Users Today : 0