अकोला – महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन, क्रीडा प्रबोधिनी, जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे ३६ व्या राष्ट्रीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर सुरु आहे. या प्रशिक्षण शिबिरास अमरावती विभागाचे क्रीडा उपसंचालक विजय संतान यांनी भेट देऊन पाहणी केली व शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य प्रशिक्षक सतिशचंद्र भट, क्रीष्णा सोनी, विजय गुजर, मधन वानी, सपना विरघट, अमर भंदरवार, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांची उपस्थिती होती.
Users Today : 22