कारंजा– दिनांक 14 मार्च पासुन मध्यवर्ती कर्मचारी संघटना,शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि विविध संघटनानी पुकारलेल्या बेमुदत संपात राज्य सरकारी कर्मचारी व विविध संघटनेचे, विविध विभागाचे कर्मचारी चौथ्या
दिवशी कारंजा तहसील कार्यालय परिसर येथे जुन्या पेंशन च्या मागणी करीता आयोजित संपात 352 कर्मचारी ऊस्फुर्तपणे सहभागी झालेत त्यामुळे सलग चौथ्या दिवशी सकाळी 10:30 ते 2:00 यावेळात संप सुरु होता. बेमुदत संपाच्या चौथ्या दिवशी तहसीलदार धिरज मांजरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शंकर नांदे यांनी भेट देऊन संपकाऱ्याना मार्गदर्शन केले.
सदर संपात मध्ये प्रामुख्याने महसूल विभाग, आरोग्य विभाग, ग्रामसेवक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, नगर परिषद कर्मचारी यांचा उस्फुर्त प्रतिसाद दाखवत याप्रसंगी उपस्थितांनी संपाबाबत मार्गदर्शन केले. महसूल संघटना,
पुरोगामी शिक्षक संघटना, अखिल भारतीय शिक्षक संघटना,साने गुरुजी शिक्षक सेवा संघ, उर्दू शिक्षक संघटना,आदर्श बहुजन शिक्षक संघटना, शिक्षक समिती, माध्यमिक शिक्षक संघ,शिक्षण संघर्ष संघटना, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना, महाविद्यालयिन शिक्षकेत्तर संघटना,आरोग्य संघटना, विजुक्ता संघटना,ग्रामसेवक संघटनेच्या,वनविभाग संघटना, कृषि साहाय्यक संघटना, परिचर संघटना, प्रहार दिव्यांग संघटना,पदाधिकारी व कार्यकर्ते आदिनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर संपाला तहसीलदार धिरज मांजरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शंकर नांदे यांची भेट देऊन संपकर्याना मार्गदर्शन केल्यामुळे उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.सदर संपाला आजतकचे प्रतिनिधि जकाउल्ला खान कॅमेरामन साजिद भाई ,के न्यूज़चे धनराज राठोड,बंडूभाऊ इंगोले, आरिफ पोपटे यासह अनेक पत्रकार बांधवानी भेट दिली.जुन्या पेंशनची मागणी पूर्ण होई पर्यन्त बेमुदत संप सुरुच राहिल अशी संपकरी मंडळीने प्रतिक्रिया दिली आहे.
Users Today : 0