*लव्ह जिहाद च्या मुद्यावर आ. गायकवाड सभागृहामध्ये आक्रमक

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा: (खोज मास्टर) अकील शाह

महाराष्ट्र राज्याच्या सभागृहामध्ये लक्षवेधी उपस्थित करताना बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी मतदार संघातील

महत्त्वाच्या विषयावर बोलतांना प्रामुख्याने, क्रीडा विभागाचा मुद्दा, लव्ह जिहादचा मुद्दा, नगर पालिकेच्या शाळेमध्ये सीबीएससी पॅटर्न सुरू करण्याचा मुद्दा, अंगणवाडीच्या संदर्भातील मुद्दा असे विविध प्रकारचे विषय उपस्थित केले.

क्रीडा विभागाच्या विषयावर बोलताना आ. संजय गायकवाड यांनी सांगितले, क्रीडा विभागाच्या बाबतीमध्ये विभागीय क्रीडा संकूल करिता ५० कोटी, जिल्हा क्रीडा संकुल करिता २५ कोटी, तालुका क्रीडा संकुल करिता ०५ कोटी रुपयाचा निधी जाहीर केल्यानंतर त्याचा शासन निर्णय देखील झालेला होता, परंतु त्याचा निधी वितरित न झाल्यामुळे ही कामे होऊ शकली नाही, तसेच बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागाराला डे- नाईटचे पहिले मैदान ज्याला फूड लाईट त्याच्यावरील गॅलरी हे सर्व त्यामध्ये प्रस्तावित आहे, त्यामुळे ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी त्यामुळे हा निधी दिला तर लवकर पूर्ण होतील.

बुलढाणा शहरातील १० खेळाडू हे जागतिक खेळामध्ये गेल्या चार-पाच वर्षांमध्ये त्यांनी आठ वेळेस पार्टिसिपेट केल तसेच त्यांनी ७ गोल्डमेडल त्यांनी मिळवली, १० जणांची निवड त्या खेळामध्ये त्या खेळामध्ये झाली, परंतु त्या खेळाडूंची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांच्याकडे जाण्या-येण्यासाठी

*सभागृहामध्ये मांडले बुलढाणा मतदार*

*संघातील विविध ज्वलंत प्रश्न*..

पैसा उपलब्ध नसतो त्यांना साहित्य उपलब्ध नसते त्यामुळे अशा खेळाडूंना तशा प्रकारचा निधी शासनाने उपलब्ध करुन देण्याची मागणी केली बुलढाणा शहरातील तसेच मतदार संघातील शिक्षण विभागाच्या बाबत बोलतांना आ. गायकवाड यांनी बुलढाणा शहरांमध्ये बुलढाणा मलकापूर रोडवर शिक्षण विभागाच्या ताब्यातील मार्मल स्कूलची जवळपास ५० वर्षापासूनची पडीक जागा त्या ठिकाणी पडून आहे त्या जागेवर नगरपालिकेला सीबीएसई पॅटर्न सुरू करण्याकरिता ही जागा नगरपालिकेला हस्तांतरित तसेच डीएड येथील जागा नगरपालिकेच्या इमारती करता प्रस्तावित करण्याची मागणी केली. महिला व बालकल्याण विभागाच्या बाबतीमध्ये तसेच आदिवासींच्या बाबतीमध्ये डोंगरी विभागामध्ये १६ गावांचा समावेश करण्यात यावा, बुलढाणा हा आदिवासीबहुल जिल्हा असून कार्यालय अकोला येथे असल्याने ते कार्यालय बुलढाणा येथे देण्यात यावा याची मागणी केली. लव्ह जिहाद या महत्त्वाच्या विषयावर बोलताना, आ. संजय गायकवाड यांनी सभागृहामध्ये • आक्रमक होत मतदार संघातील तसेच महाराष्ट्रातील अनेक उदाहरणे उपस्थित करीत धर्मांतरावर बंदी आणून लव्ह जिहादवर कायदा करण्याची मागणी आ. संजय गायकवाड यांनी विधानसभे मध्ये केली आहे.

 

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *