मुंबई : UDID नसलेल्या लाभार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा; ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

KHOZ MASTER
1 Min Read

मुंबई प्रतिनिधी

दिव्यांग बांधवांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, विशेष सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांकडे वैश्विक ओळखपत्र (UDID Card) नसल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेऊन मुदतवाढ देण्यात आली आहे.

शासन निर्णयानुसार आता UDID कार्ड सादर करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे १.५० लाख दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना तसेच इतर विविध सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ या कालावधीत विनाव्यत्यय सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे अद्याप UDID कार्ड नाही, त्यांचे अनुदान थांबवले जाणार नाही, असेही शासनाने नमूद केले आहे.

या कालावधीत लाभार्थ्यांना UDID कार्ड काढण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन आणि सहकार्य प्रशासनामार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहे. कोणताही पात्र दिव्यांग लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहू नये, हा शासनाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

एकूणच, हा निर्णय दिव्यांग समाजासाठी दिलासा देणारा ठरला असून सामाजिक सुरक्षा योजनांच्या सातत्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

0 9 7 2 2 6
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *