_तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते._
गजानन माळकर,तालुका प्रतिनिधी मंठा
मंठा तालुक्यातील हेलस येथे तालुका विधी सेवा समिती व वकील संघ मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल व्हॅन लोक अदालत व कायदे विषयक शिबीर दि.१४ मार्च मंगळवार रोजी आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रमुख प्रवक्ते म्हणून ॲड.डी, एस, निंबाळकर यांनी लोकअदालत या विषयावर तर ॲड.ए,एच, मोगल यांनी कायदे विषयक शिबीर या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न्यायाधीश एस,वाय, शेख मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून हेलसच्या सरपंच सौं. गुंफाबाई बनसोडे या उपस्थित होत्या त्यांच्या सोबत ॲड.ए.ए.कुलकर्णी, ॲड. सोहेल पठाण न्यायलयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अधिकारी, पोलीस पाटील, उपसरपंच व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते शेवटी न्यायाधीश शेख मॅडम यांनी अध्यक्ष समारोह केला.
Users Today : 0