संतोष जाधव बुलढाणा अल्ट्रा रनर हम फिट तो इंडीया फिट

Khozmaster
3 Min Read

जवळपास 20 वर्षांपूर्वी हातनी सारख्या खेडेगावातून एक स्वप्न घेऊन बुलढाणा मध्ये स्थायिक होऊ पाहत असलेला सगळ्यांन सारखाच मी पण एक तरुण. जवळपास 2018-2019 पर्यंत सगळं काही व्यवस्थित सुरू होत. पण अचानक एक दिवस मी मधूमेह आणि त्यातच थायरॉईड आजाराने ग्रासलो . क्षणभर अस वाटल संपल सगळ.

पण नाही उरलेल्या आयुष्यात काहीतरी वेगळ करूयात म्हणून सुरू झाली रनिंग ची सुरुवात तस तर रोजच्या आयुष्यात आपण धावतच असतो. माझ्या धावण्याला साथ मिळाली ती ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर ग्रुप ची त्यात मार्गदर्शन मिळाले माझे मित्र श्री. डॉ. विजय वाघ सर, श्री. डॉ. संदीप परहाड सर, श्री. डॉ. निलेश कोल्हे सर, तसेच मधूमेह , थायोराइड , साठी डॉ . विनायक हिंगने सर यांचे. मर्गदर्शन घेउन धावने चालु केल.


सुरवातीला धावणे हे खूप जड गेले कारण डायबेटिक असल्या मुळे खूप लवकर थकवा जाणवायाचा, खूप घाम यायचा आणि अस्वस्थ वाटायच. पण नाही साखर कंट्रोल करण्यासाठी का होईना आपल्याला धावायालाच लागेल हे लक्षात आले. मग काय सुरुवात झाली ती हलू हलू 100/200/500 मीटर, मैल दर मैल करत आनि थेट ति सर्वप्रथम खामगाव हाफ मॅराथोन जानेवारी 2022 मध्ये भाग घेंउ न पूर्ण करन्या पर्यन्त आणि मग सुरू झाला फुल मॅराथोन चा प्रवास..पुणे इंटनॅशनल फुल मॅराथोन फेब्रुवारी 2022 मध्ये 3 तास 54 मिनटे, हैद्राबाद मॅराथोन 4 तास 09 मिनिटे आणि जानेवारी 2023 मध्ये टाटा मुंबई आंतरराष्टरीय मॅराथोन 3 तास 29 मिनिटे मध्ये पूर्ण केली.

पण पुढे लक्ष होत टाटा उलट्रा मॅराथोन लोणावळा जी की 50 किलोमीटर ची होती..

या स्पर्धबद्दल खूप ऐकलं होत खूप कठीण असते रात्री असते चड उतार असतात एलेवेशन असते आणि बरच काही.

Tata Ultra Marathon 2023

50 किलोमीटर

वेळ 4 तास 40 मिनिटे

मी पहिल्यांदाच टाटा अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो. 50 किमी आणि 35 किमी या दोन कॅटेगिरी होत्या. ही माझी पहिलीच अल्ट्रा होती आणि त्यात मी 50 किलोमीटर मध्ये सहभागी झालो. 50 किमी हा रनिंग इव्हेंट रात्री दीड वाजता सुरू झाला. रूट खूप चढउतार आणि कठीन होता. रात्रीची रनिंग असल्यामुळे डोक्याला टॉर्च बांधून रन पूर्ण केली. मी सुरुवतीपासूनच टार्गेट ठेवून गेलो होतो की काहीपण झाल तरी मला ही स्पर्धा 5 तासाच्या आत पूर्ण करायची होती.सुरुवातीचे पाच ते सहा किलोमीटर खूप मला कठीन गेली,पाय उचलत नव्हता परंतु नंतर चांगला रिदम बनला. 25 किलोमीटर अगदी सहज पूर्ण केले. 32 व्या किमी ला एका स्पर्धकाला हायड्राशेन साठी मदत केली आणि ठरल्या प्रमाणे 4 तास 40 मिनिटांत स्पर्धा पूर्ण केली. स्पर्धेचे आयोजन खूप छान झाले होते प्रत्येक वळणाला वॉलेंटियर्स आमची काळजी घ्यायला होते त्यामुळे भीती वाटली नाही.

 

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *