ऋणानुबंध समाज विकास संस्थेचे कार्य उल्लेखनीय* सेवानिवृत्त उपजिल्हाधीकारी रमेश घेवंदे

Khozmaster
2 Min Read

महेंद्र हिवाळे) प्रतिनिधी

चिखली:- शहरात अनेकवर्षानंतर प्रमच बौध्द वधुवर परीचय मेळाव्याचे आयोजन ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली व्दारा संचालीत ऋणानुबंध बौध्द वधुवर सुचक केंद्र यांनी पंचशील बुध्द विहार गजानन नगर चिखली येथे केले होते. यावेळी बुलडाणा जिल्हयासह अकोला, वाशिम, जालना, जळगाव येथील 115 वधुवर यांनी अधिकृत नोंदणी करुन आपला परीचय दिला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष फुले आंबेडकर जयंती उत्सव समीतिचे अध्यक्ष एस.एस. गवई, उद्घाटक प्रा. डाॅ. राजु गवई, विशेष उपस्थितीत सेवानीवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे, मार्गदर्शक प्रा.डाॅ. सुभाष राऊत, ईंजी. एन.के. सरदार, तर प्रमुख उपस्थीतीत वंचीत नेते अर्जुन बोर्डे,बोधाचार्य भारत साबळे, प्रताप मोरे पत्रकार दै. देशोन्नती, सुभाष पाखरे, सचिन मोरे हे होते.

ऋणानुबंध समाज विकास संस्थेच्या माध्यमातुन प्रशांत डोंगरदिवे व रुपाली डोंगरदिवे यांनी तुकाराम आश्रय वृध्दाश्रम सुरु करुन वृध्दांची अविरत सेवा करीत आहे. तसेच ऋणानुबंध बौध्द वधुवर सुचक केंद्र उभारुन आज भव्यदिव्य असा वधुवर परीचय मेळावा यशस्वी केला आज जवळपास 115 वधुवरांनी आपला परीचय दिला आहे. यामुळे लग्न संबध तात्काळ जुळतिल व याकामासाठी लागणारा वेळ व पैसा वाचेल असे मेळाव्याचे आयोजन करुन शेकडो समाज बांधवांना एकत्रीत करुन समाज सेवा करणे खरोखर संस्थेचे कार्य उल्लेखनीय सुरु आहे असे गौरवोउद्गार सेवानिवृत्त ऊपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे यांनी केले. तर पालक सध्या मुला मुलींचे विवाह जुळवण्यासाठी परेशान आहेत.सुयोग्य वधू वर मिळत नाही. म्हणून आशाप्रकारचे परिचय मेळावे होणे ही काळाची गरज आहे असे प्रतीपादन डाॅ राजु गवई यांनी उद्धाटनप्रसंगी केले. तर ऋणानुबंध संस्थेच्या सदैव राहु व लागेल ते सहकार्य करु असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.एस. गवई यांनी मांडले. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावीक प्रशांत डोंगरदिवे, सुत्रसंचालक मा. संजय निकाळजे, तर आभार प्रदर्शन रुपाली डोंगरदिवे यांनी केले. बौध्द वधुवर परीचय मेळावा यशस्वीतेसाठी प्रितम मिसाळ, रवीशंकर डोंगरदिवे, विश्वनाथ खंदारे, सचिन कस्तुरे, डाॅ रविंद्र अंभोरे, जयदेव मघाडे, संदिप वाकोडे, किरण वानखडे, संतोष जाधव, बाळु कासारे, पत्रकार संजय निकाळजे, पत्रकार मयुर मोरे, मीठ्ठु मनिष मोरे, राजेंद्र सुरडकर यांनी परीश्रम घेतले.

 

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *