आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अपयश झाकण्यासाठी कामाचे श्रेय घेऊ नये माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर

Khozmaster
2 Min Read

देऊळगाव राजा प्रतिनिधी, राजेश पंडित-देऊळगाव राजा येथे माजी आमदार डाॅ. शशिकांत खेडेकर यांच्या काय॔लयात यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याने महाविकास आघाडी सरकारच्या काळात जेवढा निधी तीन वर्षात सिंदखेडराजा मतदार संघात आला नाही तेवढा निधी शिंदे- फडणवीस सरकारच्या सहा महिन्याच्या कार्यकाळात मातृतिथ॔ सिंदखेडराजा मतदार संघाच्या विविध विकास कामासाठी अनेक पटीने निधी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपलब्ध झालेला आहे. खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनात मी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून निधी आणण्यास यशस्वी झालो. त्या विकास कामाचे भूमिपूजन आ. डॉ. राजेंद्र शिंगणे करीत असल्याचा आरोप करीत माजी मंत्र्यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये असा घनाघात माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला .देऊळगाव राजा शहरातील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर बोलत होते. आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे श्रेय घेऊन नागरिकांची दिशाभूल करीत आहे. येणाऱ्या काळात जनतेला काय उत्तर देणार किती दिवस खोटे बोलणार जनतेला मूर्ख बनविण्याचे काम सोडा आणि विकास कामाचे पुरावे द्या असे थेट आवाहन त्यांनी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना दिले. विकास कामाचे पुरावे जनतेसमोर ठेवा आणि आपण केलेल्या कामाचे श्रेय घ्या असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला मतदारसंघातील महसूल भवन साठी हिवाळी अधिवेशनात दिनांक 14 -11- 2022 रोजी सन 2022 – 23 अर्थसंकल्पात मिळणे बाबत ज्यावर कोणतीही आवक जावक क्रमांक किंवा मंत्र्याचा रिमार्क सुद्धा नाही दिलेले पत्र सन 2023 – 24 च्या अर्थसंकल्पात अधिवेशनात मंजूर झालेल्या निधीसाठी व्हायरल करून एक प्रकारे जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे सध्या मंत्रिमंडळात जेवढे मंत्री आहे त्यांच्या प्रत्येक खात्यामार्फत खासदार प्रतापराव जाधव यांच्या माध्यमातून मतदार संघाला निधी मिळावा यासाठी सतत मी पाठपुरावा भेटीगाठी घेत आहे. याप्रसंगी शिवसेना जेष्ठ नेते धनशीराम शिंपणे उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर, विजय देव उपाध्ये नंदन खेडेकर ता प्रमुख अनिल चित्ते, सलीम पठाण, संदीप नागरे, सचिन व्यास, मोरेश्वर मीनासे, संतोष बंगाळे, विनोद कोल्हे, सुभाष सवडे आदी उपस्थित होते.

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *