शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान;
पंचनामे करण्याचे शेतकऱ्यांची मागणी
सोयगाव प्रतिनिधी
गोकुळसिंग राजपूत सोयगाव –तालुक्यातील कंकराळा, माळेगाव व जरंडी आदी परीसरात शुक्रवारी दुपारी ३ वाजेदरम्यान अर्धा तास झालेल्या वादळी व गारपिटीच्या पावसाने केळी, गहू, ज्वारी व मका पिके आडवी होऊन शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले. या परिसरात झालेल्या पावसात १५० ते २०० हेक्टर वर पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.तालुक्यातील कंकराळा, माळेगाव व जरंडी परिसरात शुक्रवारी दुपारी २.४५ ते ३.१५ दरम्यान अर्था तास सोसाट्याच्या वादळासह मेघांच्या कडकडाट होऊन गारपिटीचा जोरदार पाऊस झाला. दरम्यान बोरांच्या आकाराच्या गारांच्या पावसामुळे शेतक-यांच्या केळी, गहू, ज्वारी व मका पिके जमिनदोस्त होऊन अतोनात नुकसान झाले. अनेक पिके वाया गेली. दुपारी झालेल्या अवकाळी या वादळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादान करून टाकली. वादळामुळे कपाशीसह पिके जमिनदोस्त झाली असुन शेतात तळ्याचे स्वरूप आले आहे. नाल्याना पुर आला होता.सोयगाव तालुक्यात शुक्रवारी जरंडी,कंकराळा तर सावळदबारा परिसरात शनिवारी रात्री अचानक वादळाने व पाऊसाने गारपीटीच्या पावसाने मका, ज्वारी,केळीची पिके आडवी होऊन अतोनात नुकसान झाले आहे.दरम्यान नुकसानीच्या पाहणी साठी कर्मचारी नसल्याने ते कर्मचारी जुन्या पेंशनच्या मागणीसाठी संपावर असल्याने या संपाची झळ शेपकऱ्यांना बसली आहे. सरसकट पंचनामे करुन नुकसान भरपाईची मागणी करून परिसरात जवळपास ४० ते ५० टक्के नुकसान होऊन देखील महसूल व कृषी खात्याचा एकही अधिकारी फीरकला नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहे. या परिसरात सरसकट पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतुन होतांना दिसत आहे. नुकसानीची आकडेवारी उपलब्ध नाही
कंकराळा, जरंडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने किती नुकसान झाले, याची आकडेवारी उपलब्ध नाही, नुकसानीचा पाहणी अहवाल एक दोन दिवसात येईल तद्नंतर पंचनामे करण्यात येईल अशी शक्यता असून तीही धुसर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Users Today : 23