छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
छत्रपती संभाजीनगर : वीजबिल वसुलीस गेलेल्या महावितरणच्या पथकास शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीजबिल थकबाकी वसुली करण्यासाठी महावितरणची मोहीम सुरू आहे. बिल न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा या मोहिमेत खंडित केला जात आहे. २० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी महावितरणच्या पॉवर हाऊस उपविभागाचे कर्मचारी बारापुल्ला गेट येथे वसुलीसाठी गेले असता थकबाकीमुळे त्यांनी आरोपी विजेंद्र सोनवणे याचा वीजपुरवठा खंडित केला. यामुळे आरोपी विजेंद्र सोनवणेसह त्याच्या आई-वडिलांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणला. अखेर बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचारी शेख नवाब यांच्या फिर्यादीवरून आरोपी विजेंद्र सोनवणे व त्याचे आईवडील अशा तिघांवर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
Users Today : 23