जलजागृती सप्ताहानिमित्‍त जलदौड स्पर्धा उत्साहात

Khozmaster
3 Min Read

बुलडाणा: ( खोज मास्टर) अकील शाह

दि. 21 : जलसंपदा विभागातर्फे दि. 16 ते 22 मार्च 2023 या कालावधीत जिल्ह्यात जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त जिजामाता प्रेक्षागार येथे जलदौड स्पर्धा घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी दौड स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवली. यावेळी उपस्थितांना जलप्रतिज्ञा देण्यात आल

व्यापारी संकुलात दि. 20 मार्च रोजी सकाळी 7.30 वाजता वॉटर रन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 18 वर्षाखालील मुलींमध्ये प्रथम गौरी राठोड, चिखली, द्वितीय ज्योती आराख, तिसरा क्रमांक पुजा मुखमाले हिने स्थान पटकावले. 18 वर्षावरील मुली, महिला गटात पहिला क्रमांक स्नेहल ऊमाळे, दुसरा प्रज्ञा सरकटे, तर तिसरा क्रमांक कोमल हिवाळे यांनी मिळविला.18 वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम प्रणय टिचुकले, द्वितीय तेजस कानडजे, तिसरा क्रमांक शिवकुमार राठोड यांनी पटकाविला. 18 वर्षावरील गटात पहिला आकाश बारवाल, द्वितीय गजानन नागवे, तिसरा क्रमांक वैभव बरडे यांनी प्राप्त केला. खेळाडुंना प्रोत्साहन दिल्याबद्दल सिद्धी सोनुने ही चिमुकली, तर 75 वर्षे वयाचे मोहनसिंग तोमर यांचा जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यावेळी कार्यकारी अभियंता प्रशांत संत, अमोल चोपडे, एस. एस. सोळंके, सहायक अधिक्षक अभियंता तुषार मेतकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे प्रमुख उपस्थित होते. यावेळी स्पर्धकांना जलप्रतिज्ञा देण्यात आली. पाणीटंचाईची निवारणासाठी उपलब्ध जलस्त्रोताचे संरक्षण आणि संवर्धन तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून मनोज श्रीवास, विजय वानखेडे, दिपक जाधव, हर्षल काळवाघे, राजेश डिडोळकर, रविंद्र गणेशे यांनी काम पाहिले. चंद्रकांत साळुंके यांनी सूत्रसंचालन केले.जलजागृती सप्ताहानिमित्त गेल्या आठवडाभरात विविध उपक्रम राबविण्यात आले. यात सोमवार, दि. 20 मार्च रोजी मोताळा बसस्थानक येथे जलप्रतिज्ञा वाचन आणि पाण्याचे महत्व याबाबत पत्रक वाटप करण्यात आले. तसेच रविवार, दि. 19 मार्च रोजी रोहना, ता. देऊळगाव राजा येथे उपविभागीय अधिकारी खडकपुर्णा धरण व्यवस्थापन उपविभाग, देऊळगाव मही यांनी जलजागृती सप्ताहानिमित्त माहिती देऊन पाणी बचतीचे महत्व सांगितले. संग्रामपूर येथे जिगाव प्रकल्प पुनर्वसन उपविभाग, शेगाव यांनी जलजागृती केली.रोहडा आणि कोलारा या गावाच्या लाभ क्षेत्रातील नागरिकांकरिता जलजागृती सप्ताहांतर्गत सिद्धेश्वर संस्थान कोलारा येथे शनिवार, दि. 18 मार्च रोजी वसुंधरा पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष शेणफडराव घुबे यांनी पाणी बचतीबाबत व्याख्यान दिले. तसेच जिगाव प्रकल्प उपविभाग शेगाव, जळगाव जामोदतर्फे शाळांमध्ये जल प्रतिज्ञा घेण्यात आली. मेहकर पाटबंधारे उप विभागातर्फे दुसरबीड येथील जीवन विकास विद्यालयात ‘पाण्याची बचत काळाची गरज’ विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. तसेच लोकहित पाणी वापर संस्था मांडवा प्रकल्प व संत तुकाराम पाणी वापर संस्था दुसरबीड, दुसरबीड कोपबंचे अध्यक्ष, संचालक व पदाधिकारी समवेत बैठक घेण्यात आली. यात सिंचन कायदा आणि पाण्याच्या बचतीबाबत चर्चा करण्यात आली.

 

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *