जिल्ह्यातील १० कृउबासचा निवडणूक कार्यक्रम २७ मार्चपासून तर २८ एप्रिलला मतदान*
बुलडाणा : ( *खोज मास्टर* ) *अकील शाह* मलकापूर कृषी उतपन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम आज २१ मार्च रोजी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी जाहीर केला असून यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील १० कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम २७ मार्चपासून सुरू होणार असून २८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे रखडलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.
बाजार समित्यांच्या कारभारा संदर्भात उच्च न्यायालयाचे मुख्य पीठ, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठासमोर अनेक याचिका प्रलंबित होत्या. या सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी होऊन अशासकीय प्रशासक मंडळे रद्द करून शासकीय प्रशासक नियुक्तीसह ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या निवडणुकीस पात्र आहेत तेथे ३० एप्रिलपर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील ७ कृ. उ. बा समितीमधील प्रशासक मंडळ रद्द करून त्याठिकाणी शासकीय प्रशासकांची जानेवारी २०२३ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. तर आज राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जा.क्र. रासनिप्रा/ कक्ष- ११ / बाजार समित / २१५६ / २०२३ दि. २१/०३/२०३ या आदेशानुसार जाहीर केला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा, मेहकर, लोणार, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, नांदुरा व मलकापूर या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका पार पडणार असून या करीता सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा एक. ए. कृपलानी यांनी एका आदेशान्वये जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची मणूक केली आहे.
Users Today : 22