बुलढाणा, दि. २२ (प्रतिनिधी ) विचारवंत, समाजसूधारक, समाज प्रबोधनकार, शिक्षणतज्ञ, उद्योगपती, बांधकाम क्षेत्रातील नावाजलेल नाव, स्त्रि शिक्षणाचे अग्रदूत, अस्पृश्यता व जातविरोधी चळवळीचे पुरस्कर्ते, सत्यशोधक समाजाचे संस्थापक क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फूले यांच्या १९६ व्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रा. सदानंद माळी यांची निवड करण्यात आली आहे.
यावर्षी महात्मा फुले जयंती वैचारिक पद्धतीने वेगवेगळे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन साजरी करण्याचे सुर्वानुमते ठरले. सदर जयंती उत्सव सिमतीच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय महात्मा फूले समता परिषदेचे राज्य सल्लागार तथा योगीराज अर्बन बुलडाणाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सदानंद माळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी गजानन घिरके, वैभव लाड व राजू पवार यांची उपाध्यक्ष म्हणून तर गोपाल निलखन यांची सचिव म्हणून निवड
करण्यात आली. सहसचिव म्हणून विशाल खंडारे तर कोषाध्यक्ष पदी सुरेश चौधरी, मुख्य समन्वयक म्हणून चंद्रशेखर माळी, प्रकाश वानेरे, दलित मित्र माधवराव हुडेकर, अंबादास गोरे, प्रल्हाद चौधरी, विश्वनाथ चौधरी, डॉ. शिवशंकर गोरे, के. टी. पांडव, रमेश नारायण हुडेकर, प्रभाकर घोंगडे, विनोद गायकवाड, जगन्नाथ उबाळे, सुरेश राऊत, डॉ. आशिष खासबागे, विश्वनाथ माळी, भास्कर बावस्कर, राजू मोहले, प्रदिप डांगे, वैभव इंगळे, आशिष लहासे यांची निवड करण्यात आली. समितीचे सदस्य म्हणून निलेश तायडे, गजानन हुडेकर, अनंता लहासे, जगदिश मानतकर, विष्णू उबाळे, गणेश खरात, गजानन वानखेडे, विष्णु उबाळे, राजेश जाधव, सतिष उबाळे, आशिष उगळकर तर प्रसिद्धी प्रमुखपदी हर्षनंदन वाघ व लक्ष्मीकांत बगाडे, पवन सोनारे यांची निवड करण्यात आली. या बैठकीला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
Users Today : 22