महिलांच्या आर्थिक सबलीकरनाणे देश विकासाचे उंच शिखर गाठेल

Khozmaster
2 Min Read

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

वैजापूर ता,२१ :महिला विकासाच्या केंद्र बिंदू आहेत ,त्यांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केल्यास व त्यांच्याद्वारे निर्मित वस्तूला प्राधान्य क्रमाने बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास देशाचे आर्थिक सबलीकरण होण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन तालुक्यातील जीवन विकास महाविद्यालय शिवूर येथील व्यवसाय प्रशिक्षित महिलांना प्रमाणापत्र वितरण कार्यक्रमात वैजापूर उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी आय,पी,एस, महक स्वामी यांनी मंगळवार(ता,२१)रोजी महाविद्यालयात केले,त्या पुढे म्हणाल्या की,महिलांनी चुकीच्या मार्गाने न जाता अंगच्या कौशल्य आधारे वस्तू निर्मित करून स्वाभिमानाने जगावे,आपल्या मुलांवर योग्य संस्कार करून त्यांना उच्च शिक्षण द्यावे, प्रमुख पाहुणे उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर यांनी ही विशद केले की जगाच्या एका पाहणीत असे दिसून आले आहे की, या पुढे पैशाने श्रीमंत असणाऱ्यांचे स्थान दुय्यम राहणार तर चारित्र्य ने श्रीमंत असणाऱ्याचे स्थान समाजात अति उच्च राहणार आहे, महिलांनी प्रशिक्षण मधील ज्ञानातून स्वावलंबी व्हावे,व समाजात उच्च स्थान प्राप्त करावे ,या समयी माजी आमदार तथा राष्ट्रवादी चे जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील,निर्मला इन्स्टिट्यूट च्या नॅन्सी रोद्रीग्ज,सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी ही महिलांना संबोधित करून महिला सक्षमीकरण व महिला सबलीकरण , यावर जोर देत महिलांनी धीट, सुदृढ,व सबल होऊन आपला व कुटुंबाचा सर्वांगीन विकास साधावा असे आवाहन केले,अध्यक्षस्थानी जे,के,जाधव विकास मंचचे जे,के,जाधव होते,दोनशे महिलानी विविध व्यवसाय प्रशिक्षण घेतले असून त्या गृह उद्योगातून अर्थार्जन करून स्वावलंबी बनत आहेत,या प्रसंगी ऐश्वर्या व्यवहारे, कल्पना पवार,तेजल पगारे, द्रारका पवार, तेजस्विनी कुलकर्णी यांनी आपले प्रशिक्षण नंतरचे वस्तू तयार करून विकण्याचे अनुभव कथन केले.

 

0 9 3 7 4 1
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *