एल. आर. टी. चा सीनियर अंडर ऑफिसर रोहित डिगे याचे जल्लोषात स्वागत

Khozmaster
3 Min Read

दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालयाचा एन. सी. सी. कॅडेट सीनियर अंडर ऑफिसर रोहित डिगे यांचे आज अकोला स्टेशन वर मोठ्या हर्ष उत्साहात स्वागत करण्यात आले. श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालयात एन. सी. सी. विभागातर्फे सुद्धा मोठ्या उत्साहात आणि हर्ष जल्लोशात त्याचे स्वागत करण्यात आले. सीनियर अंडर ऑफिसर रोहित डिगे याची दिल्ली येथे झालेल्या थल सेना कॅम्प मध्ये निवड झाली होती. रोहित आज 3 महीन्यानंतर परत आला असून या कॅम्प मध्ये त्याने महाराष्ट्र डायरेक्टटेड चे नेतृत्व केलेले आहे. ११ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. अकोलाचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बिजॉय चौधरी, लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला तसेच एल.आर .टि. कॉलेज ऑफ कॉमर्स अकोलाचे प्राचार्य डॉ. एस. जी. चापके आणि एन. सी. सी. ऑफीसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या मार्गदर्शनात त्याने महाराष्ट्र डायरेक्टरेटचे प्रतिनिधित्व करून दिल्ली येथे महाविद्यालयाचे आणि ११ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. अकोलाचे नाव गाजवले आहे. स्वतःमध्ये असलेल्या सुप्त गुण या कॅम्प दरम्यान संपूर्ण भारतासमोर सादर केले आहे. अमरावती एन. सी. सी. ग्रुप हेडक्वार्टर अंतर्गत सीनियर अंडर ऑफिसर रोहित डिगे हा महाराष्ट्र डायरेक्टटेड तर्फे रायफल शूटिंग या प्रकारामध्ये सहभागी झाला होता. या सैनिकी कॅम्पची सुरुवात अमरावती येथे ५ जुलै, २०२२ पासून झाली होती. अमरावती व अहमदनगर येथील ७ वेगवेगळ्या कॅम्प तसेच स्पर्धा पार करून तो दिल्ली पर्यंत पोहोचल. या कॅम्पच्या दरम्यान त्याने इंटर बटालियन काॅम्पिटिशन मध्ये द्वितीय स्थान आणि इंटर ग्रुप काॅम्पिटिशन मध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले. 27 सप्टेंबर ला कॅडेट रोहित डिगे यांना कर्नल के. एम. भागवत यांच्या हस्ते गोल्डन रैंक देऊन सम्मानित केले गेले. दिल्ली येथे झालेल्या थल सेना कॅम्प दि. १४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२२ या दरम्यान होऊन, या कॅम्प मध्ये त्याला डि. जी. एन. सी. सी. लेफ्टनंट जनरल गुरुबीरपाल सिंह यांच्या सोबत संवाद साधन्याची संधी प्राप्त झाली आहे. श्रीमती एल. आर. टि. कॉलेजचे प्राचार्य एस. जी.चापके व कैप्टन डॉ. अनिल तिरकर यांनी रोहितचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. रोहित डिगे हा त्याच्या यशाचे श्रेय त्याची आई वर्षा डिगे ला देतो. मानाचा तुरा महाविद्यालयाच्या शिरात खोवल्याबद्दल दि. बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. विजयकुमारजी तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष श्री. रवींद्रजी जैन, मानद सचिव श्री. पवनजी माहेश्वरी, सहाय्यक सचिव इंजि. अभिजितजी परांजपे व समस्त माननीय कार्यकारी सदस्यांनी त्याचे अभिनंदन केले आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *