निवडणूक आयोगाविरोधात शिवसेनेची निदर्शने

Khozmaster
1 Min Read

सत्तेच्या जोरावर भाजप लोकशाही संपवण्याच्या मार्गावर – ……

 

बुलढाणा:निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. केंद्रातील भाजप सरकार सत्तेच्या जोरावर लोकशाही संपवण्याच्या मार्गावर असल्याच्या घणाघाती आरोप यावेळी लखन गाडेकर यांनी केला. केंद्रातील मोदी सरकारच्या दबावाखालीच निवडणूक आयोगाने हा निर्णय दिल्याचे आंदोलनकर्त्या शिवसैनिकांचे म्हणणे आहे. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत निर्णय देण्याची घाई कशामुळे झाली हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असेही सूचक विधान यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे. ही राज्यघटनेची पायमल्ली असल्याचे बुलढाणा तालुकाप्रमुख लखन गाडेकर म्हणाले. निवडणूक आयोगाच्या या अविवेकी निर्णयाच्या विरोधात यावेळी प्रचंड घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली. या आंदोलनात सभा संघटक अशोक इंगळे ,शिवसेना तालुकाप्रमुख अमोल शिंदे, अमोल बुधवत,हेमंत खेडेकर,प्रकाश डोंगरे, बबन खरे,गणेश सूनुने,जगदीश मनवतकर,एकनाथ कोरडे,सचिन परांडे,शेख आखिल,मोहन निमरुट, दीपक पिंपळे,सदाशिव बुधवत, विजय इतवारे,योगेश पालकर, सुनील गवते,सुधाकर आघाव,डॉ मधसुदन साळवे,गणेश पालकर,राहुल शेलार,किरण दराडे,दादाराव रिंढे,गोकुळशिंग जगताप, प्रफुल जायभाये,यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

0 9 3 7 4 1
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *