सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव भारतीय कृषि संस्कृतीचा अनिवार्य घटक असलेल्या तृणधान्याला जागतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पौष्टिक तृणधान्य पिकांच्या लागवडीसाठी पुढाकार घ्यावा, असे कृषी सहाय्यक विजयसिंह राजपूत यांच्या कडून आवाहन करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारताने यासंबंधीचा ठराव मांडला होता. यापूर्वी देखील कृषी शास्त्रज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांनी तृणधान्याला पौष्टिक धान्य संबोधून अन्नधान्य सुरक्षा कायद्यामध्ये तृणधान्याचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे, देशात नाचणी, ज्वारी, बाजरी ही मुख्य तृणधान्य उत्पादित होतात.तृणधान्य आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या पिकांमध्ये सर्व प्रकारची पौष्टिक गुणधर्म, खनिजे, जीवनसत्वे संतुलित आणि जास्त प्रमाणात आहेत. कमी ग्लायसेमिक इंडेक्स, उच्च कॅल्शियम, लोह, प्रथिने तसेच फायबर जास्त प्रमाणात असतात. त्यामुळेही पिके आरोग्याच्या दृष्टीने आणि भविष्यात मागणी असणारी आहेत.तृणधान्य वातावरणाशी सुसंगत आहे. तृणधान्य पिकांची वाढ कोरडवाहू जमिनीसह पर्जन्यवृष्टी असलेल्या परिस्थितीत सुद्धा होते. अगदी निकृष्ट दर्जाच्या मातीतही तृणधान्य घेता येतात. वातावरणात कार्बनडाय ऑक्साइड उत्सर्जित करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.आयसीएआर संस्थेने तृणधान्य क्षेत्रातील संशोधनामध्ये विस्तृत काम केले आहे. संस्थेने अधिक उत्पन्न देणाऱ्या तृणधान्य वाणाचे मागील वर्षात देशाच्या विविध भागात वाटप केले आहे. कर्नाटकसह देशातील सर्वाधिक उत्पादन राज्याचे स्थान वरचे आहे. तृणधान्यांची आता शहरी ग्राहकांमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. तृणधान्याचे योग्य उत्पादन घेऊन आर्थिक उत्पन्न वाढवत येते. अजूनही आपल्या देशाची खरेदी प्रणाली तांदूळ आणि गहू या पिकावरच लक्ष केंद्रीत करीत आहे कमी कलावधी, कमी पाणी आणि हलक्या जमिनीत येणारे लघू तृणधान्य पिकामधील शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणारे आहे लघु तृणधान्य पिकांमधील नाचणी, राळा, कुटकी, वरई, सावा, भगर, कोद्रा, कोदो मध्ये प्रथिने, चरबीयुक्त पदार्थ, पिष्टमय पदार्थ, तंतुमय पदार्थ, ऊर्जा विपुल प्रमाणात असल्याने पौष्टिक तृणधान्य पिके घ्यावेत, असे आवाहन विजयसिंह निकुंभ कृषी विभाग सोयगाव यांनी केले आहे.
Users Today : 22