चिखली महेंद्र हिवाळे
शतक-यांनी केले रविकांतजी तुपकरांचा जंगी सत्कार…
दरेगाव ता.सिंदखेडराजा येथे दि१९मार्च रोजी रविकांतजी तुपकर यांनी मेळाव्यातुन गावकरी व शेतकरी बांधवांशी संवाद साधला.यावेळी तुपकरांचे गावकऱ्यांनी ढोल-ताशाच्या गजरात प्रचंड उत्साहात मिरवणूक काढून जंगी स्वागत केले. या मेळाव्याला शेतकऱ्यांनी गर्दी करत प्रचंड प्रतिसाद दिला.
यावेळी *रविकांत तुपकरांनी* बोलतांना यावर्षी केलेल्या आंदोलनातून शेतकऱ्यांच्या पदरात काय पडले यांचा लेखा-जोखा मांडला. आंदोलनातून जिल्ह्यातील २ लाख १ हजार ६११ शेतकऱ्यांच्या पदरात १५८ कोटी रुपये पिकविमा पाडू शकलो याचे समाधान असल्याचे सांगीतले.तसेच जलसमाधी आंदोलनामुळे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी १७४ कोटी रुपये मंजूर झाले आहे, परंतु ते देण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. ती अतिवृष्टीची मदत मिळावी व सोयाबीन-कापसाच्या भावासाठी आपला लढा चालूच असणार आहे.तर यासाठी लवकरच आक्रमक पावित्रा घेणार असल्याचे त्यांनी सांगीतले११ फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी सरकारच्या इशाऱ्यावर शेतकऱ्यांवर अमानवीय पद्धतीने लाठीचार्ज केला व माझ्यासह शेतकरी व कार्यकर्ते यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकले. शेतकऱ्यांसाठी मी तुरुंगात काय फासावर पण जायला तयार आहे. पण मी मागे हटणार नाही, बापाच्या घामाच्या दामासाठी लढतच राहील, असा शब्द तुपकरांनी मेळाव्यास उपस्थीत गावकऱ्यांना यावेळी दिला. दरेगाव गावकऱ्यांनी केलेल्या स्वागताबद्दल त्यांचे आभार देखील त्यांनी व्यक्त केले.*यावेळी दामु अन्ना इंगोले, विनायक सरनाईक,बबनराव चेके,ज्ञानेश्वर खरात पाटिल,सहदेव लाड यांनी सुद्धा शेतक-यांच्या समस्या मांडत आपले मनोगत व्यक्त केले* यावेळी मंचावर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते
Users Today : 22