सोशल मीडियावर छायाचित्रकारां बद्दल अपमाजनक पोस्ट टाकणाऱ्याचा फोटोग्राफर असोशियन तर्फे निषेध

Khozmaster
1 Min Read

देऊळगाव राजा प्रतिनिधी राजेश पंडित 

सोशल मीडियावर छायाचित्रकारांबद्दल व त्यांच्या व्यवसायाबद्दल अपमान जनक पोस्ट टाकणाऱ्या नांदुरा येथील वसंतराव भोजने यांचा देऊळगांवराजा फोटोग्राफर असोशियन तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला .माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांना तहसीलदार यांच्यामार्फत तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले व भोजने यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संघटने तर्फे करण्यात आली

दिनांक 17 मार्च रोजी फेसबुक व व्हाट्सअप या सोशल मीडियाच्या माध्यमातून नांदुरा येथील वसंतराव भोजने यांनीसमस्त छायाचित्रकार यांना हेडगे शब्दाचा प्रयोग केला व फोटोग्राफर व्यवसायाबद्दल अपमान जनक पोस्ट टाकून समाजामध्ये बदनामी केली अशा माथे पेरू व्यक्तिवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देऊळगाव राजा फोटोग्राफर असोसिएशन तर्फे माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांना तहसीलदार शाम धनमने यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले व फोटोग्राफर संघटने तर्फे भोजने यांचा निषेध करण्यात आला .

या निवेदनावर फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष सुरज गुप्ता, अभिनव खवडे, दीपक खरात,विलास जगताप, दीपक सेवनकर, पंडित सोळंकी,गणेश माने, विजय पंडित, सतीश खांडेभराड, धर्मेश टापर ,विजय देव, आदित्य शिंदे ,ज्ञानेश्वर वाघमारे, प्रेम कुटे ,हरिदास वाघ, महेंद्र घीके, निशांत गुंजकर, सोपान खांडेभराड,वैभव जायभाय, विजय बोरकर, श्रीराम शेरे, राजेश शेरे, आनंद सोळंकी, अनिकेत भाग्यवंत, राजू सेवनकर ,आदींच्या स्वाक्षऱ्यासह व सर्व छायाचित्रकारांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

 

0 9 3 7 3 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *