नांदुरा प्रतिनिधी (शुभम ढवळे) : _चैत्र महिन्यातील चैत्र शुद्ध प्रतिपदा ही तिथी म्हणजेच हिंदू नववर्षाचा पहिला दिवस होय. आज बुधवार दि. २२/०३/२०२३ पासुन चैत्र नवरात्रीची सुरुवात झाली. हिंदु धर्मामध्ये गुढीपाडव्याला अनन्यसाधारण स्थान आहे. संपूर्ण देशातही हा सण गुढीपाडवा म्हणून साजरा करण्यात येतो यासोबतच वेगवेगळ्या भागांमध्ये हा सण वेगवेगळ्या नावांनी, श्रद्धांनी, उत्सवाच्या रूपांनी साजरा करण्यात येतो. गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. या सनाचा संपूर्ण दिवस हा शुभकार्यासाठी शुभ मानल्या जातो._
_गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागची बरीच कारणे आहेत. तसेच हा सण अनादी काळापासून साजरा करण्यात योतो. या सणाचे नैसर्गिकदृष्ट्या खुप महत्व आहे. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतुच्या आगमनाला सुरुवात होते. वातावरणात बदल होतो जुनी वाळलेली पालवी गळून झाडांना नवीन पालवी फुटते, आंब्याच्या झाडाला मोहर येतो. या वारवरणातील नवनिसर्गाचे स्वागत करण्यासाठी सुद्धा गुढीपाडवा हा सण साजरा करून नववर्षाची सुरुवात होते. हिंदु धर्मात प्रत्येकजन आपल्या घरी विजयाचे प्रतीक असणारी गुढी उभारतात. गुढीपाडव्याचे हिंदुधर्मामधील अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता अनिलभाऊ जांगळे शिवसेना शहर प्रमुख, नांदुरा यांच्या विशेष मार्गदर्शनात शिवसेना महिला आघाडी, नांदुरा शहर यांच्या वतीने २१ फूट उंच गुढी उभारून सर्वांना गुढीचे महत्व सांगितले. यासोबतच गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या सर्व सात्विक गोष्टींमागे असणारे शास्त्रीय कारण सर्वांना सांगितले. सर्वांना गाठी व कडुलिंबाचा प्रसाद देण्यात आला. उपस्थित सर्वांनी गुढीचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी नव्याऊर्जेने, उत्साहाने सात्विक गुढी उभारण्याचे आश्वासन दिले.यासोबत आज २२ मार्च म्हणजेच जागतिक जलदिन. त्यानिमित्ताने शिवसेना महिला आघाडी नांदुरा शहराच्या वतीने महिलांना पाणी हेच सर्व सजीवांचे जीवन आहे यावर माहिती सांगितली. पृथ्वीवर ७१% पाणी असले तरी पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे हे लक्षात घेऊन पाणी वाचवण्याच्या, जिरवण्याच्या पद्धती सांगितल्या. उपस्थित सर्व महिलांनी पाण्याचे महत्व लक्षात घेऊन पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करण्याचे, वृक्षारोपण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सर्वांनी मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या._ यावेळी सौ. सरिता प्रकाश बावस्कार शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख, सौ. प्रज्ञा तांदळे – उपशहर प्रमुख, भावनाताई सोनटक्के- सचिव, भाग्यश्री तांदळे-सहसचिव, सुमनबाई गव्हाळे,विजया गोरे,- सहसचिव, रेखाताई, संगीता इंगळे, संगीता शिंदे ,अनिता राऊत, अनिता हिंगणकर, लक्ष्मी वसाने, मंगला सपकाळ, रूपाली घोपे वंदना सरोदे, योगिता , लता उंबरकर लक्ष्मी घोपे,जया इंगळे, तसेच खूप मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या .
Users Today : 19