कार्यालय प्रतिनिधी
पिंपरी २३ : गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवड शहरातील एका अभियंत्याने शिक्षणाचं महत्त्व आणी देशाचा दडलेला ज्वाज्वल्य इतिहास उजागर व्हावा या उद्देशाने देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना या गुढीपाडव्याच्या शुभ दिनी ग्रंथ गुडी उभारली.
ग्रंथ गुडी चे पूजन महाराणा बटालियन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांच्या शुभहस्ते झाले याप्रसंगी त्यांनी बोलतांना सांगितले की हैद्राबाद मुक्ती संग्रामात मराठवाड्यातील अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे आणी त्याचा इतिहास कुणाला माहीत नाही आणी तो माहिती होवू दिला नाही.अशाप्रकारच्या रक्तरंजीत इतिहासाला देशापुढे आणण्याची खूप मोठी गरज आहे हे कार्य अशा ग्रंथ गुडीतून आपल्या पूर्वजांचा इतिहास नितीन चिलवंत व त्यांचे सहकारी राजपूत संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार बैस हे करत आहेत ही बाब अत्यावश्यक, महत्वपूर्ण आणी प्रशंसनीय आहे अशाप्रकारच्या ग्रंथगुड्या पुढच्या काळात सर्वांनी उभारून नागरिकांत ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करून ज्वाज्वल्य इतिहास उजागर करावा.
या कार्यक्रमाला मुंबई हून अजयसिंह सेंगर, राजपूत संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार सिंह बैस, रूग्णसेवक संघटना भोसरीचे अध्यक्ष संदीप चव्हाण,शंकरशेठ आडे,सौ.रेश्मा चिलवंत,चि.युवराज चिलवंत,चि.शौर्य चिलवंत व इतर सन्माननीय मान्यवर उपस्थित होते.
Users Today : 19