अनधिकृत जाहिरात होर्डिंगला पाठबळ कोनाचे

Khozmaster
4 Min Read

आदेश असतानांही कारवाई का होत नाही..

अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी आझाद हिंद मैदानात..

बुलढाणा : ( खोज मास्टर ) अकील शाह

मुख्यमंत्री सचिवालय व नगरपरिषद मुख्य सचिव यांच्या आदेशांन्वये अखेर नगरपरिषद बुलढाणा ने घेतलेला अनधिकृत जाहिरात होर्डिंग्जचा ठराव रद्द करण्यात आला आहे.तसे आदेश नगरपरिषद बुलढाणा जा.क्र/.बांधकाम विभाग/ नपबु/8278/2022/23 नूसार पारित केले आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी करावी अन्यथा आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासन व नपा प्रशासनास कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला.

या अनुषंगाने निवासी जिल्हाधिकारी दिनेश गीते यांना मांगन्यांचे निवेदन देऊन सदर मागणी २३ मार्चला करण्यात आली आहे.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे केलेल्या ऑनलाईन तक्रारीद्वारे सदर नियमबाह्य ठराव आणि जीव घेणे होर्डिंग्ज काढण्याची तक्रार आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. सतीशचंद्र रोठे यांनी 13/12/ 2022 रोजी Dist/CLBL/2022/61656 नुसार करण्यात आली होती. मुख्यमंत्री कार्यालय आणि नगरपरिषद प्रशासन मंत्रालयीन सचिव यांच्या आदेशांन्वये जिल्हाधिकारी बुलढाणा यांना चौकशी करण्याचे आदेशित करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी सदर प्रकरणाची वास्तविकता जाणून घेत सदर अनधिकृत ठराव आणि जाहिरात होर्डिंग्जचा करारनामा रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नगर परिषद मुख्यधिकारी यांनी जिल्हा प्रशासन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांना तसा अहवाल सादर केला आहे. तर सदर अहवाल आणि आदेशांन्वये नगर परिषद सर्वसाधारण सभा दि.13/10/2021 ठराव क्रमांक 04 रद्द करण्यात आल्याचे तक्रारदारास व जिल्हाधिकारी बुलढाणा यांना कळविण्यात आले. नियम व अटींचे उल्लंघन करून बुलढाणा शहरातील जाहिरात होर्डीगचे कंत्राट मे सुरभी फ्लेक्स प्रिंटिंग लॅब आणि मल्टी सर्विसेस बुलढाणा कैलास चंदन पसरटे यांना देण्यात आले होते.तर सदर कंत्राटदाराने सुप्रीम कोर्ट आणि महाराष्ट्र प्रॉपर्टी ऍक्ट नियमांचे व करारनाम्यातील नियम व अटींचे सूद्धा उल्लंघन कंत्राटदाराने केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. जयस्तंभ चौकात अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यासाठी जिवंत झाड कापल्याचीही तक्रार बुलढाणा शहर पोस्टेला नोंदवीन्यात आलेली आहे. तर महत्वपूर्ण गंभीर बाब म्हणजे बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकातील गांधी भवन वैयक्तिक मालमत्ता नाही. नगरपरिषद बुलढाणा ने नियम व अटींचे पालन करून सदर मालमत्ता सार्वजनिक उपक्रमांसाठी दिलेली आहे. असे असतांना गांधी भवन समितीने सूद्धा नियमांचे उल्लंघन करून अनधिकृत वैयक्तिक करारनामा सदर जाहिरात होर्डिंग्ज कंत्राटदारासोबत केलेला आहे.अशा असंख्य नियमांचे उल्लंघन जाहिरात होर्डिंग्ज उभारतांना बुलढाणा शहरात झालेले आहे. शहरातील न्यायाधीशांच्या घरासमोर, प्रशासकीय इमारतींना लागून, विश्रामगृहाच्या गेटवर, मुख्य चौकात, रस्त्याला लागून मोठमोठे जाहिरात होर्डिंग्ज नियमबाह्य उभारल्यामुळे शहरातील नागरिकांच्या जीवित्वास सुद्धा धोका निर्माण झालेला होता. शहराचे सौंदर्यीकरण खराब करन्यास कारणीभूत ठरलेले सदर नियमबाह्य जाहिरात होर्डिंग्ज त्वरित काढण्यात यावे. दिलेले कंत्राट रद्द करण्यात यावे. नियम बाह्य दिलेल्या कंत्राटाची चौकशी करून संबंधित दोषी सर्वांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. अनधिकृत जाहिरात होर्डिंग्ज चा ठराव व अनधिकृत जाहिरात होर्डिंग काढण्यासंदर्भात असंख्य तक्रारी बुलढाणा नगर परिषदेला दिलेल्या असतांना साधी चौकशीही संबंधितांनी केली नाही. त्यामुळे आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने अँड.सतीशचंद्र रोठे यांनी सदर तक्रार मुख्यमंत्री कार्यालयास आपले सरकार पोर्टलवर केली होती. निवेदन देतेवेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अँड.सतीशचंद्र रोठे, अकील शाह मोहम्मद सोफियान, सईद शाह ठेकेदार, गणेश पाटील, मोहन सोळंके, समाधान धनवे, यासह बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.सद्यस्थितीत बुलढाणा शहरातील सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांचे,गरिबांचे अतिक्रमण बुलडोझर लावून तोडन्यात येत आहे. तर नगरपालिका प्रशासन सदर अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याची हिम्मत दाखवेल का..? आदेश निघाल्यानंतर सुद्धा अनधिकृत जाहिरात होर्डिंग्ज काढण्याची कारवाई अंमलबजावणी नगरपालिका प्रशासन करेल का.? याकडेच जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे. तर आझाद हिंद शेतकरी संघटनेने केलेली महत्त्वपूर्ण मागणी, तक्रार आणि त्या अनुषंगाने वर्षभर केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक जिल्हा वासियांकडून होत आहे.

 

0 9 3 7 3 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *