लव्ह जिहाद या विषयावर आ. संजय गायकवाड यांचा लक्षवेधी

Khozmaster
5 Min Read

 

आज दिनांक- २४ मार्च २०२३ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र राज्याच्या सर्वोच्च सभागृहांमध्ये अतिशय महत्त्वाच्या लक्षवेधीवर बोलताना बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांनी लव्ह जिहादच्या विषयावर प्रश्न उपस्थित करून संपूर्ण पार्श्वभूमी सभागृहापुढे मांडली, लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींना नंतर किती संकटांना समोर जावं लागतं त्यांचे किती हाल-हाल होतात हे सांगितले…यावेळी बोलताना धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी सांगितले की असे विषय जेव्हा सभागृहामध्ये मांडले जातात तेव्हा अशा विषयाची टिंगल-टवाळी केली जाते, या विषयाला प्रेमाची व्याख्या दिली जाते, लव्हजिहाद समर्थन करणारे सुद्धा या सभागृहामध्ये आपल्याला पाहायला मिळतात असे आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांनी सांगितले.आर्मएक्टच्या कायद्यावर बोलताना जर कोणी कोणाला तलवार भेट दिली, एखाद्याने त्या तलवारीने केक कापला, तर त्या व्यक्तीवर आर्मऍक्टचा गुन्हा दाखल केला जातो, यावेळी त्या व्यक्तीचा हेतू तपासल्या जात नाही, जर अशा प्रकारे कोणी तलवारीने केक कापला, त्या व्यक्तीला कोणी तलवार गिफ्ट दिलेली असेल तर त्या व्यक्तीचा हेतू त्या व्यक्तीला भेट वस्तू देण्याचा असतो आणि जर हे चुकीचं असेल तर पोलीस कवायतीमध्ये जो पोलिस अधिकारी हातात तलवार घेऊन कर्तव्य बजावत असतो तर तो का जनतेला मारण्यासाठी तलवार उतरतो का, ऑलम्पिक आणि एशियन गेम मध्ये तलवारबाजी केली जात असते मग त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होणार का, एखाद्या नेत्याला तलवार भेट दिल्यानंतर तो सुद्धा वर तलवार करतो मग त्याच्यावर सुद्धा कोणी दाखल करणार का, भालाफेक,रायफल शूटिंग या सर्व खेळाला जागतिक मान्यता आहे त्यामुळे अशा प्रकारे ज्या मुलांवर गुन्हे दाखल केले जातात हे अतिशय चुकीचं आहे, असा प्रश्न उपस्थित केला…!मध्यप्रदेशातील अवैध दारू आणि आपल्या गावांमध्ये असणाऱ्या हातभट्ट्या ग्रामीण भागामध्ये १८-१९ वर्षाचे तरुण युवक आई-वडिलांच्या मांडीवर मरताना बघत असल्याचे सांगितले, त्यांचे संसार उध्वस्त होत आहे.या विषयावर बोलताना धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी मोताळा तालुक्यातील मोहेगाव गावाची परिस्थिती सभागृहामध्ये मांडली..!यामध्ये बोलताना भाऊंनी सांगितले की मोताळा तालुक्यातील मोहेगाव गावातील ६०% महिला विधवा आहेत, ही परिस्थिती जेमतेम सगळीकडे असल्याचे सांगितले, गावातील काही महिलांनी ज्या महिलेचे मुलं मेलेत, जिचा नवरा गेला, अशा दहा-पंधरा स्त्रियांनी जर पुढाकार घेतला की आपल्या गावातील दारू बंद करायची त्या शहरांमध्ये जातात ठाणेदारांना भेटतात एसपींना भेटतात, यामध्ये तेथील बीट जमदार त्या दारू विक्रेत्यांना सांगतो की या महिलांवर अटॅक करा, प्रत्येक दारूभट्टीचा हप्ता असतो आणि मग त्या दोघांची तेथे मारामारी होते, आणि मग ३०७ सारखे गंभीर गुन्हे ज्या महिला दारूबंदी करण्यासाठी पुढाकार घेतात त्यांच्यावर दाखल होतात, अशा अनेक घटना राज्यामध्ये आहेत,म्हणजे पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांना हे वाटतच नाही की हे प्रकार थांबले पाहिजेत, आणि त्यामुळे या माध्यमातून अनेक संसार उध्वस्त होतात त्यामुळे शासनाने कोणताही कायदा काढला तर प्रत्येक डिपार्टमेंटचा एक हप्ता वाढत असतो, आणि त्यामुळे त्या कायद्याचा वचक राहत नाही तसेच त्या कायद्याची अंमलबजावणी सुद्धा होत नाही.५३ सारख्या गुन्ह्याचा अतिरेक सध्या वाढलेला आहे, भविष्यामध्ये हे लोकप्रतिनिधी किंवा चळवळीतील कार्यकर्ते जे जनतेच्या हिताकरिता लढतात हे सर्व बंद होणार आहे कारण संबंधित अधिकाऱ्यांवर कुठलाच वचक नाही त्याची मर्जी असेल तेव्हा तू काम करेल तसेच त्याची मर्जी असेल तेव्हा तो लोकांना मदत करेल, मनात येईल तर काम करेल किंवा करणारही नाहीआणि हे सर्व येऊन ठेपतं ते आमदार आणि खासदारांवर यावेळी बोलताना भाऊंनी सांगितले की एकेक आमदार आपला संपूर्ण आयुष्य आमदार होण्याकरता वेचत असतो याचा विचार कोणी करत नाही, खासदाराचाही विचार केला जातो, आमदार हे ३६५ दिवस जनतेच्या हितासाठी काम करत असतात…!तसेच अधिकारी हे १२५ ते १५० सुट्ट्या घेत असतात, आमदार हा निवृत्त जरी झाला किंवा निवडणूक मध्ये पडला तरी सुद्धा जनतेची आयुष्यभर कामे करत असतो, आणि कुठला अधिकारी रिटायर झाला तो कधी कुणाचे काम करत नाही, आमदार खासदार हा मरेपर्यंत काम करत असतो कारण त्याची नाळ ही जनतेशी जोडलेली असते, आणि म्हणून अगदी लहानपणापासून ते मरेपर्यंत समाजाकरिता जगणारे समाजाकरिता मरणारे त्यांच्याकरिता संपूर्ण आयुष्य बरबाद करणारे अनेक पक्षातील आमदार खासदार या सभागृहामध्ये पोहोचली असल्याने सांगितले, आणि म्हणून आमदार खासदारांना टार्गेट करायचं त्यांचं सगळं दाखवायचं आणि स्वतःच मात्र झाकून ठेवायचं ही परिस्थिती सध्या संपूर्ण राज्यामध्ये पाहायला मिळत आहे…! या सगळ्या प्रक्रियेमध्ये जनावरांची तस्करी असेल, मुलींची तस्करी असेल यासाठी प्रत्येक गावाच्या एन्ट्रीवर आपण जर थर्मल स्कॅनर बसवलं तर त्या ठिकानावरून जाणारे काही जनावर असेल किंवा तेथे घडणारा गैरप्रकार आहे, तो या ठिकाणी थांबवला जाऊ शकतो….!येणाऱ्या काळामध्ये हे जे गतिमान सरकार आहे, अरबी समुद्रातील अनधिकृत मजार प्रशासनाने काढली आणि आरोप झाला, हे सरकार फक्त जाहीरबाजी करणारे सरकार आहे, त्या दिवशी रात्री सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी भाषणामध्ये सांगितलं आणि प्रशासनाने ताबडतोब दखल घेतली, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती अनधिकृत मजार उध्वस्त झाली त्यामुळे हे सरकार किती वेगवान आणि गतिमान आहे म्हणजे रात्रीला मागणी होते आणि सकाळी सूर्याची किरणे पृथ्वीला स्पर्श करण्याच्या अगोदर ॲक्शन घेतली जाते, त्यामुळे हे सरकार किती गतिमान आहे हे धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले..

0 9 3 7 3 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *