टिप्परना दिली एसटी बसला धडक, २२ प्रवासी जखमी

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा : ( खोज मास्टर ) अकील शाह

मेहकर-खामगाव मार्गावरील जानेफळ नजीकच्या समृद्धी महामार्गाच्या अंडरपास नजीक एसटी बस व रेतीवाहक टिप्परमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात सुमारे २२ प्रवासी जखमी झाले. जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले असून, जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. आज शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला.

शेगाववरून मेहकरकडे ही मेहकर आगाराची बस येत असताना टिप्परने धडक दिल्याचे प्राथमिक वृत्त आहे. यात २२ प्रवासी जखमी झाले असून बहुतेक प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील आहे. जखमींची नावे आशू बोरकर, सीताराम दळवी, मदन गाडे, सतीश गायकवाड, विनोद गायकवाड, विमल गायकवाड, रामेश्वर भोपळे, पूर्णाजी बोरकर, रामेश्वर हिवरकर ( हिवरा खुर्द ता. मेहकर), माधव नलगे ( ईसोली ता. चिखली) रत्नकला काळे (डोनगाव ता. मेहकर), किरण जाधव, श्रावणी जाधव, पांडुरंग भोलनकर (पिंपरखेड, ता. चिखली) रुखिमिनी अवसरमोल (घाटनांदरा ता. मेहकर) मनोज राठोड (विठ्ठलवाडी ता मेहकर) सिद्धार्थ वानखेडे (कल्याना ता. मेहकर) प्रवीण बोरकर (पलसखेड ता. चिखली) परशुराम देवकर (ब्रम्हपुरी ता. मेहकर) वाल्मिक मुरडकर, यश उलटे (अमडापूर चिखली) वासुदेव फोलके (जानेफळ ता. मेहकर) सविता राजू मोंधाला (ता. मेहकर) अशी जखमींची नावे आहेत.

 

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *