सोनाळा ग्रा पं निधीचा दुरुपयोग बोगस कामे दाखवुन खोटी बिले काढणाऱ्यांची खाते निहाय चौकशी करुन कारवाई करा प्रहारचे गजानन शिरोडकार यांची मांगणी

Khozmaster
1 Min Read

बुलडाणा : ( खोज मास्टर ) अकील शाह

संग्रामपुर तालुक्यातील सोनाळा ग्रा प मोठी असल्याने लोकप्रतिनिधीच्या पाठपुराव्या मुळे ग्राम विकासासाठी निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला मात्र शासकिय निधीचा दुरुपयोग करुन निकृष्ठ दर्जाचे कामे केली बोगस कामे दाखवुन खोटी बिले काढली सदर कामाची निपक्षपाती पणाने चौकशी करा दोषी कर्मचारी कंत्राटदार यांच्यावर अशी मांगणी प्रहार जनशक्ती पक्ष शहरअध्यक्ष गजानन शिरोडकार यांनी एका निवेदनाव्दारे ग्रामविकास अधिकारी , गटविकास अधिकारी जिल्हाधिकारी सह ग्रा पं प्रशासना कडे केलीतालुक्यातील सोनाळा सर्वात मोठी ग्रा पं असुन ग्रामविकासासाठी निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला होता सदर ग्रा पं ने खाते मध्ये अफरातरफ करुन निधीचा दुरुपयोग केला दर्जाहिन कामे केली कागदोपत्री बोगस कामे दाखवुन खोटी बिले काढली कारनामा केला असल्याने खातेनिहाय चौकशी करुन संबंधीत कर्मचारी व कंत्रादार कडून वसुली करुन दोषी विरुद्ध कारवाई करण्यात यावी ग्रा पं पंचायत अतर्गत गावातील विकास कामे दर्जेदार करण्यात यावे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रा पं प्रशासनाला प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष गजानन शिरोडकार यांनी दिल्याने सोनाळा गावात एकच खळबळ उडाली असुन चर्चेला उधान आले आहे

 

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *