शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी घेराव आंदोलनात सहभागी व्हा – राहुलभाउ बोंद्रे

Khozmaster
2 Min Read

महाविकास आघाडीचा चिखलीत 27 मार्च रोजी तालुका कृषी कार्यालयाला घेरावा      

चिखली/बुलडाणा: 24 मार्च 2023

सोयाबीन व इतर शेतमालाचे बाजार भाव वाढवुन मिळावे तसेच सरकारच्या शेतकरी अहिताच्या धोरणांमुळे रखडलेल्या पिक विम्याची रक्कम व खरीप हंगामातील पिक नुकसानाची भरपाई रक्कम शेतक-यांना त्वरीत देण्यात यावी. या व शेतक-यांच्या इतर मागण्याकरीता महाविकास आघाडीच्या वतीने सोमवार, 27 मार्च 2023 रोजी घेेराव आंदोलन करण्यात येणारे आहे. या घेराव आंदोलन प्रसंगी मतदार संघातुन शेतकरी, शेतमजुर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीकांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी केले आहे.

बुलडाणा जिल्हयासह चिखली विधानसभा मतदार संघातील शेतकरी बांधवाना पिक विमा मिळावा, त्याचबरोबर सोयाबीन व उत्पादीत धान्य मालाला वाढीव भाव मिळावा या व इतर मागण्यांकरीता तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला घेराव घालुन शेतक-यांच्या या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरीता घेराव आंदोलन पुकारण्यात आले आहे. केंद्र व राज्यातील सरकार लोकषाही गिळंकृत करून देषात हुकमषाही आनणारे सरकार ठरत आहे. सरकारने देषातील जनतेवर जीएसटी ची सक्ती लाधली असुन यातुन दिवसा ढवळया सर्वसामान्यांच्या खिषावर दरोडा पडत आहे. वाढलेली महागाई पेट्रोल,डिसेल, गॅंस, खत, बि-बियाण्यांचे गगणाला भिडलेले भाव, यातुन परिस्थती दिवसादिवस अवघड होत चालली आहे. शेतक-यांकडुन होणारे उत्पादीत होणारे सोयाबीन, कापुस, इत्यादी पिकांना वाढीव भाव मिळावा, या व इतर मागण्यांसाठी गत आठवडया भरापासुन बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे हे चिखली विधानसभा मतदार संघातील खेडोपाडी व गावोगावी जावुन शेतकरी,कष्टकरी,शेतमजुर व ग्रामस्थांषी संवाद साधुन राज्य व केंद्रातील भाजपा सरकार कषा पध्दतीने शेतक-यांना आर्थीक अडचणीत आणु पाहत आहेत. याबध्दल जनजागृती करीत आहे.

शेतक-यांच्या न्याय हक्काच्या या मागणीकरीता महाविकास आघाडीच्या वतीने सोमवार दिनांक 27 मार्च रोजी घेराव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक 24 मार्च 2023 रोजी चिखली येथील जनसेवा कार्यालयात चिखली विधानसभा मतदार संघातील किसान सेल व कॉग्रेसच्या विविध आघाडयाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तथा शेतक-यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने आयोजीत केलेल्या घेराव आंदोलन प्रसंगी मतदार संघातुन शेतकरी, शेतमजुर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीकांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी केले आहे.

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *