श्री, स्वामी समर्थ प्रकट दिनी वैजापूर केंद्रात विविध कार्यक्रम वैजापूर

Khozmaster
1 Min Read

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे श्री , स्वामी समर्थ प्रकट दिन निमित्त येथील श्री स्वामी

समर्थ केंद्रात श्री स्वामी चरित्र सारामृत च्या २१अध्याय चे वाचन गुरुवार(ता,२३)रोजी शहरातील पाचशे भक्त भाविकांनी केले, यात महिलांची संख्या जास्त होती, ग्रंथ वाचिका कविता पुरी होत्या,यानंतर केंद्रात महाप्रसाद वाटप ही करण्यात आले,सर्व भक्त भाविकांनी आपल्या घरून जेवणाचे डबे आणून “मांदयाळी”भोजनाचा व महाप्रसाद एक दुसऱ्या भक्तांना वाटून आनंद घेतला,रांगोळी ही या निमित्ताने काढण्यात आल्या,अत्यंत प्रसन्न व आनंदी वातावरणात केंद्रात भक्त भाविकांनी प्रकट दिन साजरा केला, केंद्रात माजी नगरसेवक लिमेश वाणी, सुरेश आलूले यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते,त्यांना अरविंद तुपे,रोहित गुळसकर, सी,के,पवार,धोंडीरामसिंह राजपूत ,अनिकेत सोनवणे,नवनाथ शिंदे,श्रीमती आलूले यानी वेळोवेळी सहकार्य केले,

 

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *