सावळदबारा परिसरात शेतकऱ्यांच्या तोंडाला फुसले पानं
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात शेतकरी गेल्या चार महिन्यांपासून अतिवृष्टीच्या अनुदानाची प्रतीक्षा करणाऱ्या बाधित ३२ हजार ९८० शेतकऱ्यांपैकी हजार ६६८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर गुरुवारी प्रशासनाने २८ कोटी ७० लाख ४१ हजार रुपयांची अनुदानाची रक्कम जमा केली असून, १५ हजार ३१२ शेतकयांच्या खात्यावर मात्र तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे एक छदामही जमा झाला नाही. त्यामुळे “कही खुशी, कही गम’ अशी परिस्थिती सोयगाव तालुक्यात निर्माण झाली आहे.केल्यानंतर राज्य शासनाकडे ४९ कोटी ६५ लाख ५४ हजार रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती; परंतु गेल्या चार महिन्यांपासून शासनाकडून विविध कारणांने मदत निधी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. अखेर राज्य शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून दिल्यानंतर व होते. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने
अतिवृष्टीच्या तडाख्यात ३२ हजार ९८० शेतकऱ्यांच्या शेतातील ३८ हजार ९८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले पाडल्यानंतर बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मदतनिधी जमा करण्यास सुरुवात झाली आहे. सोयगाव तालुक्यातील 32 हजार ९८० शेतकन्यांपैकी १७ हजार ६६८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर गुरुवारी प्रशासनाने २८ कोटी ७० लाख ४१ हजार रुपयांची अनुदानाची रक्कम जमा केली आहे. मात्र १५ हजार ३१२ शेतकऱ्यांच्या खात्यावर एक छदामही जमा झाला नसल्याने सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरातील शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर निघत आहे. या दरम्यान, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर निधी वर्ग करण्याचे काम तहसीलदार रमेश जसवंत यांच्यासह आपत्ती निवारण पथकातील दीपक फुसे, शरद पाटील, राहुल शिंदे आदी कर्मचाऱ्यांनी केले.उर्वरित सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पूर्ण पणे नुकसान भरपाई भेटणार आहे.एकही शेतकरी वंचित राहणार नाही जे काही शेतकरी वारस लागलेले आहेत त्यांनी कार्यालयात कागदपत्रे सादर करावी त्यांनाही नुकसानचा लाभ मिळणार रमेश जसवंत तहसीलदार सोयगाव
Users Today : 18