सोयगाव येथे श्री दक्षिणमुखी हनुमान मुतीॅ प्राणप्रतिष्ठा सोहळा

Khozmaster
2 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

सोयगाव येथील श्री.दक्षिणमुखी हनुमान मुतीॅ प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजक समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने दि.२६ मार्च ते २९ मार्च २०३३ बुधवार पर्यंत महामंडलेश्वर प.पु.दयानंदजी महाराज शेलगाव, महंत प.पु.ओंकरगिरी महाराज गुरु,काशीगिरी महाराज मुडेॅश्ववर संस्थान केळगांव यांच्या उपस्थितीत महादेव पिंड,नंदी, गणपती,शितला माता,मेस्को माता याची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. दि.२६ पासून महारुद्र हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ झाला असून, सोमवार (दि. २७) विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मंगळवार रोजी (दि. २८) सकाळी ७ वाजता मदल पूजन, अभिषेक, ९ वाजता प्रधान हवन, दुपारी १२ वाजता प्राणप्रतिष्ठा व कळस स्थापना होऊन पूर्णाहुतीनंतर महाआरती होईल.हनुमान चालिसाचे पठण करणार आहेत. दि.२९ बुधवार रोजी महाप्रसाद दुपारी १२ वाजेपासून सुरुवात करण्यात येणार आहे त्यानंतर महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता होईल. यावेळी पुरोहित श्री.शांताराम दत्तात्रय जोशी यांचे मार्गदर्शन होणार आहे.श्री.लोकेश अकोलकर त्र्यंबकेश्वर,श्री.दिनेश शास्त्री नाशिक,श्री.प्रशांत शास्त्री गोरे नाशिक,श्री.मनोज शास्त्री ढेरेगे त्र्यंबकेश्वर,श्री.पंडीत ओंकार शास्त्री ढेरेगे त्र्यंबकेश्वर उपस्थित असणार आहे.तरी सोयगाव पंचक्रोशीतील भाविकांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहनसमस्त गावकरी मंडळी सोयगाव यांनी केले आहे.या दरम्यान, हानुमान मंदिरात प्रासादिक भजनी मंडळातर्फे पहाटे सूर्योदयाला हनुमान जन्म साजरा करण्यात येईल. दि.२६ रविवार रोजी भव्य मिरवणूक

दक्षिणमुखी हनुमान मंदिरापासून मिरवणूक काढण्यात येणार आहे.तरी भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी आवाहन समस्त गावकरी मंडळी सोयगाव यांनी केले आहे.

 

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *