आ़ गायकवाड यांनी भ्रष्टाचार आणला चव्हाटयावर आरोग्यमंृी तानाजी सावंत यांनी दिले चौकशीचे आदेश
बुलढाणा, ( खोज मास्टर ) अकील शाह
येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात अनेक महत्त्वाची साहित्य हे खरेदी करण्यात आल्याचे कागदपत्रे दाखवून तब्बल 99 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला. आमदार संजय गायकवाड यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लक्षवेधीतून हा भ्रष्टा्रचार चव्हाटयावर आणला आहे सदर प्रकरणाची महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री ना.तानाजी सावंत यांनी चौकशीचे आदेश देखील दिलेण् त्यामुळे आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली सदर लक्षवेधी क्रमांक सात शनिवारी मांडण्यात आला.
बुलढाणा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात नुकतेच काही वर्षांपूर्वी आवश्यक असलेले साहित्य खरेदी करण्यात आले होते यात तब्बल 99 कोटी रुपयाचे साहित्य दाखवण्यात आले मात्र यातील अनेक साहित्य हे केवळ कागदावरच होते या संदर्भात स्थानीय आरोग्य प्रशासनाने सभागृहाला माहिती देखील दिली मात्र सदरची माहिती ही दिशाभूल करणारी असल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला असून जिल्हा सामान्य रुग्णालया राज्य सरकारच्या माध्यमातून आवश्यक साहित्य तथा औषधी साठी 99 कोटी रुपयांचा निधी मागण्यात आला होता यामध्ये 80 ते 50 बेड इसीजी मशीन व्हेंटिलेटर सिरीज पंप डायग्नोसेशन मशीन प्रिंटर कम्प्युटर एसी स्ट्रेचर बेड टीव्ही कुलर अशा अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यात आल्या असल्याचे दाखवण्यात आले सदर साहित्य हे 120000 प्रमाणे 92 बेड खरेदी केले परंतु तेही अस्तित्वात नाही डायलिसिस मशीन देखील खरेदी करण्यात आल्या परंतु ते देखील अस्तित्वात नाही आयसीयू मध्ये भरणवाडी तयार केले गेले परंतु ते सुद्धा कागदावरच दाखवण्यात आले
फायर प्रतिबंधक साहित्य ज्या कंपनीने बसवले ती कंपनी मुळात त्या अटी आणि शर्ती मध्ये बसत नाही तरीसुद्धा केवळ आर्थिक हित जोपासून त्या कंपनीला कंत्राट दिला गेला, अशाप्रकारे ९९ कोटी रुपयांचा अपहार या शासकीय रुग्णालयामध्ये केला गेला, ज्या कंत्रांतदाराला सिव्हिल सर्जन ने ब्लॅक लिस्ट चे पत्र दिले त्याला परत हे ९९ कोटी रुपयाचे सोडून परत २३ कोटी रुपयांचा कंत्राट दिला गेला, त्यामध्ये सर्व शासकीय निवड डावल्ली गेली, त्यामुळे सरकारी दवाखान्यांमध्ये सर्व गोरगरिबांना औषधी ऑपरेशनची सामान इतर काही साहित्य लागल्यास ते बाहेरून विकत घेऊ लागतं, जिल्ह्याचे हॉस्पिटल हे सर्व तालुक्याला औषधी पुरवत असते आणि अशाच प्रकारे जर खरेदीच केली गेली नसेल आणि अगोदर ९९ कोटी आणि आता २३ कोटी एवढा जर अपहार होत असेल तर हा अक्षम्य आणि गंभीर गुन्हा आहे
- या सर्व प्रकारांमध्ये कंत्राटदार, औषधी तसेच इतर साहित्य सप्लाय करणाऱ्या कंपन्या, एजन्सी, यांच्याशी हात मिळवणी करून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या तसेच शासनाच्या पैशाशी अपहार करणाऱ्या साहित्य न घेता बिल काढणारे संबंधित अधिकारी व कर्मचारी तसेच जे जे कोणी यामध्ये सहभागी असेल या सगळ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्याचे ऑडिट करून ताबडतोब त्या संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करणार का हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला तसेच या सर्व प्रकारची स्टॉक नोंदणी नाही, ज्या ठिकाणी चुकीच्या एंट्री घेतलेल्या आहेत, आणि हा सर्व जो अपहार झाला त्या सर्व प्रकरणाची आपण गांभीर्याने चौकशी करून ची निविदा आता २३ कोटीची ज्याला आपण ब्लॅकलिस्ट केलेलं आहे ती निविदा आपण फेरनिविदा काढणार का, ज्या कंपनी तसेच एजन्सी यांनी अल्प पुरवठा किंवा पुरवठाच न करता पूर्ण बिले काढले आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करून अधिकारीआणि या कंपन्याकडून शासनाच्या पैशाची आपण रिकव्हरी करणार का आणि जे औषध भंडारपाल त्या ठिकाणी नॉन टेक्निकल आहेत त्यांच्या ऐवजी आपण टेक्निकल पोस्ट भरणार का हेतीन प्रश्न आमदार संजय भाऊ गायकवाड यांनी उपस्थित केले.यावर उत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री ना.तानाजी सावंत यांनी सांगितले की, हा विषय सेन्सिटिव्ह असून बुलढाणा जिल्हा शैल्य चिकित्सक यांच्यामार्फत खरेदी केलेल्या प्रकाराबद्दल जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या ठिकाणी जी बोगस बिले केलेली आहेत, खोट्या सह्या घेतलेल्या आहेत याची सविस्तर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले
Users Today : 18