देऊळगाव राजा प्रतिनिधी राजेश पंडित
प पू श्री धुंडीराज महाराज कवीश्वर यांचा पुण्यतिथी उत्सव निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
शहरातील श्री धुंडीराज महाराज मठ येथे प पू श्री धुंडीराज महाराज कविश्वर यांच्या पुण्यतिथी निमित्त दि २३ ते २५ मार्च त्रिदिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये दररोज काकडा ,महिलांचे सामूहिक श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण ,हरिपाठ व हरिकीर्तन तसेच पंचपदी झाली .ह भ प हरिभाऊ महाराज वायाळ ,ह भ प सुनील महाराज आष्टीकर ,तसेच ह भ प श्री संत चरणदास निकम गुरुजी यांचे काल्याचे किर्तन झाले.यामध्ये पंचक्रोशीतील टाळकरी ,वारकरी व भजनी मंडळ, ब्राम्हणवृंद सहभागी झाले होते .
श्री धुंडीराज महाराज यांच्या समाधीस्थळी समाधीचे अभिषेक पूजन व महाआरती ब्राम्हणवृंदांन च्या प्रमुख उपस्थीतीत श्री धुंडीराज महाराज यांचे वंशज तसेच गुरूपर्य शास्री महाराज व आई साहेब यांच्या प्रमुख उपस्थीतीत करण्यात आली .सायंकाळी हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .
सिनखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी पुण्यतिथी उत्सव सोहळ्याला भेट दिली
पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन श्री धुडीराम महाराज कवीश्वर पुण्यतिथी उत्सव समिती यांनी केले .उत्सव यशस्वीते साठी अध्यक्ष जुगलकिशोर धन्नावत यांच्या मार्गदर्शनात समिती सदस्य, यांनी परिणाम घेतले .तसेच देळगावराजा हायस्कूल देऊळगाव राजाचे प्राचार्य शिक्षक व विद्यार्थी शहरातील सेवाभावी स्वयंसेवक यांनी भंडारा नियोजनासाठी विशेष सहकार्य केले .
Users Today : 18