भंगार बसेस घेऊन वाहकांना स्वतःचा व प्रवाशांचाही जीव धोक्यात घालून कर्तव्य पालन करावे लागते.
▪️असंख्य एसटी बसेस रस्त्यातच फेल झाल्याचे दैनंदिन समोर येत आहे.
▪️पुढाऱ्यांच्या मालकीच्या अत्याधुनिक बसेस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोठे कटकारस्थान असल्याचे समोर येत आहे.
▪️ पुढाऱ्यांच्या अत्याधुनिक बसेस भाडे तत्त्वावर घेण्यासाठीच महामंडळ स्वतःच्या बसेस जाणीवपूर्वक भंगार करत आहे.
▪️ परंतु त्यामध्ये निष्पाप नागरिकांचा जीव जातोय हे पण जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला जात आहे.
▪️असा गंभीर आरोप आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे यांनी केला आहे.
बुलढाणा: ( खोज मास्टर ) अकील शाह
गंगाखेड डेपोची गाडी आज २६ मार्चला दुपारी तीन दरम्यान राजुर घाटातून बुलढाणा कडे येत असतांना सदर एसटी बस मध्ये तांत्रिक बिघाड होता. त्यामुळे सदर बस मधून प्रचंड धुर निघत होता.
तरीही सदर बस मध्ये असंख्य प्रवासी बसवून त्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास सुरू होता. सदर बस मधून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्यामुळे रस्त्यावरील इतर वाहनांना ये जा करणे दुरापास्त झाले होते. त्यामुळे वेळप्रसंगी अपघात होण्याची ही शक्यता नाकारता येत नव्हती. ज्यामुळे वाहकांसह असंख्य प्रवासांचाही जीव धोक्यात आलेला होता. एकीकडे ड्रायव्हर, कंडक्टर बसवर यायला पाच दहा मिनिटे विलंब झाल्यास त्यांना निलंबन करन्यात येते. तर महामंडळ स्वतःच्या बसेस जाणीवपूर्वक का भंगार करत आहे. एस टी महामंडळ आकडे स्वतःचे वर्कशॉप असताना इंजिनीयर असताना महामंडळाच्या बसेसला भंगार होण्याची वेळ का येत आहे.
अशी गंभीर बाब या निमित्ताने समोर येत आहे.
तर सदर बसच्या प्रदूषणाचा फटका बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्याही वाहनाला बसला आहे.
एसटी महामंडळाच्या तथाकथित पुढाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या स्वार्थाकरिता सुरू असलेला भोंगळ कारभाराला त्वरित लगाम लावावा. प्रवाशांचे जीव धोक्यात घालण्याचे त्वरित बंद करावे. अन्यथा आझाद हिंदला रस्त्यावर उतरावे लागेल. असा इशारा आझाद हिंदचे ऍड.सतीशचंद्र रोठे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केला आहे.
तर या अनुषंगाने लवकरच वरिष्ठांना लेखी पत्राद्वारे कळविनार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Users Today : 18