जलसंवर्धनातुन हरितक्रांती झाली आता हिरकणी बॅंकेच्या माध्यमातुन आर्थीक प्रगती साधावी – माजी मंत्री भारतभाउ बोंद्रे
चिखली/बुलडाणा: 26 मार्च ब्राम्हणवाडा जलाषय प्रकल्पामुळे अमडापुर परीसरात जलसंवर्धनातुन झालेल्या हरितक्रांतीमुळे बहुतांषी ठिकाणी या परीरातील भिषन पाणी टंचाईवर मात करता आल्याने परीसर सुजलाम सुफलाम झाला आहे. सिंचनाचा अनुषेष भरून निघाल्यामुळे विविध बॅंकांनी अमडापुर कडे लक्ष केंद्रीत केल्याने मनस्वी आनंद होत आहे. तर आर्थीक प्रगती साधण्याकरीता आज शुभारंभ होत असलेल्या हिरकणी महिला बॅंकेच्या अमडापुर येथील नुतन शाखेच्या माध्यमातुन आर्थीक प्रगतीच्या वाटा मोकळया होणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री भारतभाउ बोंद्रे यांनी केले. ते अमडापुर येथील हिकरणी महिला अर्बन बॅंकेच्या 17 व्या शाखेचे उद्घाटक म्हणुन बोलत होते. यावेळी अनुराधा अर्बनचे अध्यक्ष राहुलभाउ बोंद्रे, हिरकणी महिला अर्बनच्या अध्यक्षा अॅड.सोै. वृषालीताई बोंद्रे, महाबीजचे संचालक वल्भराव देषमुख, गफार पटेल सर, आदी मान्यवरांची विषेष उपस्थिीती होती.
कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांच्या मार्गर्षनात अवघ्या दहा वर्षाच्या अल्पावधीत स्थापन झालेल्या हिरकणी महिला अर्बन बॅंकेने जिल्हयातील सहकार क्षेत्रात शाखांचे जाळे पसरवित आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. आज हिकरणी महिला अर्बन बॅंकेच्या अमडापुर येथील 17 व्या शाखेचे उद्घाटन माजी मंत्री भारतभाउ बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणुन बोलतांना माजी मंत्री भारतभाउ बोंद्रे म्हणाले त्यांच्या कार्यकाळात खडकपुर्णा, पेनटाकळी, ब्राम्हणवाडा, करडी, मासरूळ, पदमावती, इत्यादी प्रकल्पाच्या उभारणीतुन जलसंवर्धनातुन जिल्हयातील सिंचनाचा अनुषेष भरून काढल्या गेला. पाण्यासाठी आसुसलेला अमडापुर परीसर याची देही याची डोळा पाहीला असुन ड्रम लाधलेल्या बैलगाडया, महिल्याच्या डोक्यावरचे हंडे आणी कळषा, असे विदारक दृष्य होते. प्रकल्प उभारणीतुन पाणी टंचाईवर मात करीत हरितक्रांती झाली आता बॅंका आपल्या परीसरात येत आहेत, याचा फायदा परीसरातील शेतकरी, कष्टकरी, सुषिक्षीत बेरोजगार यांनी घ्यावा. हिरकणी महिला अर्बनच्या अमडापुर शाखेमुळे परीसरात आर्थीक प्रगती साधण्याकरीता मार्ग मोकळा होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले. यावेळी व्यासपीठावर वल्भराव देषमुख, विष्णु पाटील कुळसुंदर, विकास नाना डाळीमकर, समाधान सपेकर, प्रविणसेठ खंडेलवाल, महेंद्र गवळी, उदयनगर सरपंच मनोज लाहुडकर, अजय देषमुख, पुंजाजी गायकवाड, अर्जुन नेमाडे, प्रणव देषमुख, सुरेंद्र खपके, ज्ञानेष्वर सुरूषे, अरविंद देषमुख, राम डहाके, रवि पाखरे, भास्करराव कदम, रवि अण्णा काळे, शाहेद पटेल, दिलीप खंदलकर, बबनराव राउत, भिमराव हिवरकर, विजय शेजोळ, ज्ञानेष्वर डहाके, आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी महाबीजचे संचालक वल्भराव देषमुख, सुरेंद्र खपके, आदी मान्यवरांची समयोचित भाषने झाली.
हिरकणी महिला अर्बनच्या 17 व्या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी बोलतांना माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे म्हणाले की, कर्मयोगी स्व. तात्यासाहेबांनी सुरू केलेल्या सर्वच शैक्षणीक, सहकार, आर्थीक व औद्योगिक संस्था सुस्थितीत प्रगती पथावर असुन उत्कृष्टरीत्या कार्यरत आहेत. माजी मंत्री भारतभाउ बोंद्रे यांनी जनकल्याणास्तव पाणी आडविण्याची क्रांतीकारी कृती केली, त्याचा फायदा भविष्यात येणा-या पिढयांना होणार आहे. ते पुढे म्हणाले हिरकणी महिला अर्बनच्या 17 व्या शाखेचा अमडापुर सारख्या ग्रामीण परीसराचे नेतृत्व करणा-या ठिकाणी शुभारंभ होत असल्याचा मनस्वी आनंद होत आहे. मोबाईल बॅंकींग क्षेत्रा विदर्भातील हिरकणी ही विदर्भातील पहिली बॅक असुन ऑडीट अ वर्ग तर थकीत 5 टक्के आहे. ग्राहक, कर्जदार, भागभांडवल धारकांच्या विष्वासावर बॅकेच्या 150 कोटी रूपयांच्या ठेवी असुन 17 शाखा कार्यरत, 3 शाखा प्रगती पथावर व 3 शाखा प्रस्तावीत आहेत. येत्या काळात 80 कोटीचं लक्ष बॅकेने ठरविले असुन परीसरातील 150 हुन अधिक सुषिक्षीत तरूणांना रोजगार उपलब्धी बॅंकेच्या माध्यमातुन होत आहे. तर यावेळी बॅंकेकडुन ग्राहकांना देण्यात येणा-यसा अत्याधुनीक सुविधांची माहिती विषद केली. यावेळी वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पा अंतर्गत नमामी गंगे प्रकल्प पुर्तीसाठी प्रयत्नरत असलेल्या मान्यवरांसह विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणा-या मान्यवरांचा शालश्रीफळ व सन्मान चिन्ह देवुन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक व आभार प्रर्दषन नगरसेवक दिपक खरात यांनी केले तर सुत्रसंचलन गणेष धंुदळे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी मुख्य शाखा व नुतन शाखेच्यसासह संस्थेच्या सर्वच शखेतील सल्लागार मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यषस्वतीतेसाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप भावसार तथा सरव्यवस्थापक जे.बी. इंगळे यांच्या कर्मचा-यांनी अथक परीश्रम घेतले. परीसरातील उदयनगर, मंगरूळ नवघरे, धानोरी, इसोली, हराळखेड, पिंपरखेड, ऐनखेड, टाकरखेड मुसलमान, तोरणवाडा, तथा अमडापुर येथील ग्रामस्थांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
Users Today : 18