देऊळगाव राजा प्रतिनिधी राजेश पंडित
हुकूमशाही वृत्तीच्या भ्रष्ट मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकवण्याचे षडयंत्र रचले आहे अशाच एका प्रकरणात गुजरातच्या सुरत येथील कोर्टाने राहुल गांधींना आज दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे त्या निषेधार्थ देऊळगाव राजा शहर व तालुका काँग्रेस कमिटी यांनी निषेध नोंदवत बस स्टॅन्ड चौक ते जुनी नगरपरिषद येथे घोषणाबाजी करत निषेध नोंदवला यावेळी प्रमुख महाराष्ट्र समन्वय सदस्य काँग्रेस कमिटी श्याम भाऊ उमरकर तसेच प्रदेश युवक उपाध्यक्ष मनोज कायंदे व जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस रमेश दादा कायंदे नरेंद्र शर्मा सर काँग्रेस नेता यांनी
आपली मत व्यक्त केली यावेळी श्याम भाऊ उमाळकर यांनी राहुलजी गांधी यांनी सन 2019 मध्ये सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते असे वक्तव्य सन 2019 मध्ये कर्नाटकच्या एका सभेत केले होते या विधानाचा संदर्भ घेऊन दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर नुकतीच त्यांना याप्रकरणी दोन वर्षाची शिक्षा गुजरातच्या एका न्यायालयाने सुनावली त्या पाठोपाठ आज त्यांची खासदारकी देखील रद्द करण्यात आल्याचा तुघलकी निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते कश्मीर पर्यंत काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेला लाखो करोडो देशवासीयांकडून मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता केंद्र सह भाजपच्या पायाखालची वाळू सरकली त्यामुळे भाजपने राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द करण्याची कृती म्हणजे जाणीवपूर्वक ठरवून केलेले षडयंत्र आहे हा देशातील लोकशाही व संविधानावर हल्ला असल्याची प्रतिक्रिया यावेळी शामभाऊ उमाळकर यांनी दिली अखिल भारतीय काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचे वृत्त कळताच देऊळगाव राजा येथे काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी केंद्रातील भाजप सरकारचा प्रचंड घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरले काँग्रेसचा विजय असो तसेच नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी इत्यादी घोषणा यावेळी रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिल्या यावेळी महाराष्ट्र समन्वय काँग्रेस कमिटी सदस्य श्याम भाऊ उमाळकर काँग्रेस प्रदेश युवक उपाध्यक्ष मनोज कायंदे जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस रमेश दादा कायंदे काँग्रेसने ते सुभाष दराडे तालुका अध्यक्ष गजानन काकड शहराध्यक्ष विष्णू झोरे हनीफ शहा माजी नगरसेवक काँग्रेस नेते सिद्दिकी सेठ जनता सेवा नरेंद्र शर्मा सर काँग्रेस नेते राजाराम बोराटे काॅ.नेते राजू नाडे नासीर भाई काँग्रेस नेते जनता सेवा दीपक चेके यावेळी शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 18