‘उमेद’ महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने मुंबई येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांनी #उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.यावेळी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून बचत गटांची संख्या वाढविण्याची गरज असून त्यासाठी अधिकाधिक महिलांना बचत गटांमध्ये सहभागी करुन घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. ‘उमेद’ मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढ, केडर नियुक्तीवरील बंदी उठविणे, पदोन्नती प्रक्रिया पूर्ववत राबविणे, विनंती बदल्या, मानधनातील तफावत, कर्मचारी संघटनेला शासन मान्यता, उमेदमधील स्वयंसहायता बचत गटांना खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूक निधी आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ जी शिंदे साहेब यांनी सांगितले.प्रंसंगी खा.भावना गवळी,राजेश कुलकर्णी,नरेश म्हस्के,शीतल म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.