बालपणीच रमजान रोजा पकडणाऱ्या मुजाहिद शाह चा सत्कार

बुलढाणा शहीद शाह जिल्हा प्रतिनिधी/हिंदू मुस्लिम सामाजिक एकात्मता दृढ करण्यासाठी आझाद हिंद च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमातून नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. वर्तमान परिस्थितीत देशात सामाजिक द्वेष निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत असतांना आझाद हिंदच्या वतीने हिंदू मुस्लिम सामाजिक एकात्मतेसाठी घेतलेला पुढाकार राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत करणारा आहे.हिंदू मुस्लिम सामाजिक एकता उपक्रमांतर्गत आज २८ मार्चला सायं. आझाद हिंद संघटनेच्या संपर्क कार्यालयात रमजान निमित्ताने रोजा पकडणाऱ्या बालकांचा पुष्पगुच्छ व फराळ साहित्य वाटप करून सत्कार करण्यात आला.श्री शिवाजी महाविद्यालयातील तेरा वर्षीय मुजाहिद शहा अकिल शहाने रमजानच्या पहिल्या रोजा पासून आज पाचव्या दिवशीही रोजा ठेवला आहे.संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी शेतकरी कष्टकऱ्यांच्या हितासाठी प्रार्थना करीत सदर रोजा ठेवल्याची भावना यावेळी मुजाहिद ने व्यक्त केली आहे.यावेळी आझाद हिंदचे अँड सतीशचंद्र रोठे, योगेश कोकाटे, सय्यद युसुफ , असलम शाह, पवन ढगे, अकिल शाह,सईद शाह, मोहम्मद सोफियान, महेमूद शाह,गणेश पाटील, समाधान धनवे, सुरेखाताई निकाळजे, संजय एंडोले,पंचफुलाताई गवई, सिंधुताई अहिर, गजानन झांबरे यासह बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते
Users Today : 18