आगीचे भिषण तांडव; गोठ्याला आग लागल्याने ८ जनावरांचा मृत्‍यू

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा : शाहीद शाह जिल्हा प्रतिनिधी जिल्ह्यातआगीच्या घटनांच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. अशीच एक मनाला हेलावून टाकणारी घटना बुलढाणा तालुक्यातील इरला येथे रात्रीच्या सुमारास घडलीय. शेतातील गोठ्याला आग लागल्याने या आगीमध्ये ८ जनावरांचा जळून मृत्‍यू झाला.इरला (जि. बुलढाणा) येथील शेतकरी भागवत सरोदे यांच्‍या शेतात जनावरे बांधण्यासाठी गोठा केला आहे. येथे जनावरे बांधून ठेवलेले असतात. शेतकरी सरोदे हे नेहमीप्रमाणे चारापाणी करुन गोठ्यामध्ये गुरे बांधलेली होती. तसेच या गोठ्यामध्ये त्यांनी शेतीपयोगी साहित्य देखील ठेवलेले होते. दरम्‍यान रात्रीच्या सुमारास सरोदे यांच्या गुरांच्या गोठ्याला आग लागली. यामध्‍ये आठ जनावर आणि शेती साहित्य जळले दहा लाखाचे नुकसान शेतकरी सरोदे यांच्‍या गोठ्यात असलेली ८ जनावरांचा आगीत जळून मृत्‍यू झाला. तसेच गोठ्यात ठेवलेले शेतीपयोगी साहित्य सुद्धा जळून खाक झाल्याने त्यांचे दहा लाख रुक्षपयांचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला असून शेतकरी भागवत सरोदे यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

 

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *