कळमनुरी तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयाचे काम प्रगतीपथावर चालू असून सदरील कामांमध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे माती मिश्रित रेती तसेच अन्य साहित्य सामग्री हे अतिशय निकृष्ट दर्जाचे वापरल्या जात असून सदरील कामासंदर्भामध्ये वेळोवेळी सामाजिक कार्यकर्ते यांनी निवेदन देऊन सुद्धा संबंधित कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद हिंगोली तांबे यांच्याकडून कुठल्याच प्रकारचे कामांमध्ये सुधारणा करण्यात आली नाही त्यामुळे नाराजीने बेमुदत उपोषणाचा मार्ग अमोल भिकाजीराव घोंगडे तसेच बालाजी देशमुख यांच्या वतीने अवलंबण्यात आला आहे दिनांक 29/03/2023 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत असल्याचे सांगितले आहे उपोषणातील प्रमुख मागण्या पंचायत समिती इमारतीच्या बांधकामा संदर्भामध्ये गुणवत्ता तपासणी औरंगाबाद कार्यालयांच्याकडून दिलेले सर्व अहवाल तसेच वेळोवेळी शाखा अभियंता तसेच कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या विजिट कामासंदर्भामध्ये मारलेले शेरे या सर्व बाबीच्या अहवालाची मागणी केली आहे
Users Today : 18