आझाद हिंदचे अँड.सतीशचंद्र रोठे यांच्या दूर्धर आजारावरील शस्त्रक्रिया यशस्वी.

Khozmaster
1 Min Read

अथक प्रयत्नातून चार इंचाची गाठ पायातून काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला.डॉ.गणेश गायकवाड व सहकाऱ्यांच्या प्रयत्नाला यश.बुलढाणा:सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव आंदोलन आणि सामाजिक उपक्रमातून जनसेवेतत सक्रिय असणारे आझाद हिंदचे अँड सतीशचंद्र रोठे यांच्यावरील शस्त्रक्रिया आज यशस्वीरित्या संपन्न झाली आहे.

जास्त वेळ उभे राहने,चालणे यामुळे डाव्या पायाच्या टाकीत ३/१० से.मींची गाठ सदृश्य कुरूप झाले होते. त्यावर आज सकाळी साडे दहा दरम्यान सुवर्ण नगर, बुलढाणा येथील गायकवाड हॉस्पिटलला सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ एम एस. डॉ.गणेश गायकवाड , भुलरोग तज्ञ डॉ. विजय पाटील, सहकारी प्रतिभा गायकवाड मॅडम,सुनील जाधव, विकास जाधव,स्वप्निल झनके,सचिन तायडे, रिया कराळे सिस्टर,अश्विनी चव्हाण सिस्टर यासह वैद्यकीय तज्ञांनी यशस्वी शस्त्रक्रिया करीत तीस मिनिटच्या अथक प्रयत्नांतून सदर गाठ बाहेर काढली आहे.मगील एक वर्षापासून सदर गाठी मुळे अँड रोठेंना चालणे,उभे राहणे दुरापास्त झाले होते. वैद्यकीय उपचार सुरू होते. परंतु आराम पडत नसल्यामुळे आज सदर ऑपरेशन करण्याचा निर्णय वैद्यकीय तज्ञांनी घेतला. सदर गाठी मुळे संपूर्ण पायाला गॅगरिंग होण्याची शक्यता होती, प्रसंगी पाय कापण्याची वेळ सुद्धा नाकारता येत नव्हती. सदर ऑपरेशन मुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे.आझाद हिंद परिवारासह डॉ.गणेश गायकवाड व टीमने सदर दूर्धर आजारावरील शस्त्रक्रिया यशस्वी केल्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *