बेईमानीच्या दुनियेत अजूनही ईमान कायम आहे

Khozmaster
3 Min Read

 

दररोज सतत आपल्याभोवती अनेक चांगल्या व वाईट घटना घडत असतात . ह्या घटना घडत असताना मनाच्या जलाशयात तरंग उमटतात , भावना शब्द रूप घेतात आणि विचारांना दिशा मिळते आणि घडलेल्या घटनेचे दृष्य कागदावर लिहले जातात. मानवी नीतिमूल्य जपण्यासाठी धडपडणारा कुणी गवसल तर लेखणीच्या स्तंभातून प्रक्षणारे किरण दूरवर पोहचावे म्हणुन लेखणी उचलावीसी वाटली…च्या युगात जीवन जगत असताना कुणाला कोणत्या गोष्टीचा आनंद होईल, कुणाला कोणत्या गोष्टीचं दुःख होईल, कुणी कधी बेईमानी करेल आणि कोणी कधी इमान राखेल हे सांगणे खूप कठीण झाले आहे तरी पण ईमानदार माणसांची संख्या अजूनही कायम आहे . प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळे प्रसंग घडत असतात. आज असाच एक प्रसंग माझ्या नजरेसमोर घडला . बेरोजगारी युगामध्ये सुशिक्षिताना रोजगार मिळणे कठीण झाले आहे, असाच एक सुशिक्षित बेरोजगार आज मी पेट्रोल पंपावर पोटाच्या भुकेसाठी झगडतानी पाहिला. आपले रोजचे दैनंदिन काम करतं असताना पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकांची गाड्यांची ये जा चालू होतो… कामावर असणारे वर्कर आपले काम चोक पणे आपले काम पाडत होतें… अश्यातच एक सामान्य कुटुंबातील मोल मजुरी करण्याऱ्या वीटभट्टीवर काम करण्याऱ्या मजुरांची चार चाकी वाहन तेथे आले नेहमी प्रमाणे वर्कर त्या गाडीमध्ये डिझेल भरत असताना भरलेल्या डिझेलच्या पैश्यापेक्षा घाईगडबडीने , अनावधानाने शिल्लक पैसे देण्यात आले तो गाडीवाला निघत असताना अर्ध्या मैलावरगेल्यावर त्या मजुराचे ईमान जागे झाले .  कुणाला दहा रुपये तरी सापडले तरी त्याला एक वेगळाच पराकोटीचा आनंद होतो, तो मनातल्या मनात चोर चांदण्यानसारखा आनंद साजरा करतो… पण त्या मजुरांच्या मनात लालसेची भावना न येता त्यांचे इमान जागरूक होताना दिसतं होते त्याने मालकाला सांगितले आपणं भरलेल्या डिझेल च्या किमती पेक्षा जास्त पैसे आपल्याला परत देण्यात आले. त्याने गाडी मालकाला सांगीतले मालक तो पण आमच्या सारखा मजुरच आहे. त्याच्या हिशोबाच्या पैश्यात जर त्याला गडबड दिसली तर त्याचा मालक त्याची आजची मजुरी कपात करेल . आजच्या मजुरीवर त्याचे आणि परिवाराचे पोट आहे. जसे आम्ही पोटासाठी कामे करतो तसा तो पण कामगारच आहे मालक ! मालक आपण आपले ईमान जिवंत ठेऊया , आपण त्याला आलेले पैसे परत करूया. बघू तर त्याच्या मनाला आणि आपल्या हृदयाला किती आनंद मिळतो. असे तो आपल्या गाडी मालकाला सांगत होता. मालकाने स्मित हास्य दिले आणि चल रे ! म्हणुन बोलला आणि मालकाने गाडी पंपाच्या दिशेने वळवली आणि थोड्याच क्षणात पंपावर पोचले. गाडीपंपावर पोचताच मालकाने मजुराकडे पैसे दिले आणि सांगीतले घेरे राज्या . मजुराने ते पैसे हसत घेत त्या कामगाराला पैसे परत केले , त्या कामगाराने त्या ईमानदार मजुराचे आभार तर मानलेच सोबत आनंदाची मिठी सुध्दा मारली. आलिंगन सुटताच मजुरांच्या डोळ्यातून बक्षीस पात्र अश्रू दिसायला लागले , त्या मजुराला क्षणीक असे वाटायला लागले की इमानदारीने सुध्दा जग जिंकता येते . प्रामाणिक माणूस इच्छा नसतानाही प्रसिद्ध होतो.

✒️ पत्रकार शिवानंद सुभाष पवार देऊळगाव साकर्शा

 

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *