
बुलडाणा : ( खोज मास्टर ) अकील शाह/ महाराष्ट्र शासन लोका भिमुख कार्यक्रम राबवित असून गतिमान काम करणारे आहे. लोककलावंतांच्या विविध मागण्या रास्त असून मी स्वतः शेवटच्या घटकातील माणसाशी जुळलेलो असल्याने याविषयी मला चांगली माहिती आहे. बुलढाणा शहरात लोककवी वामनदादा कर्डकांचा पुतळा उभारण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येतील. तसेच महाराष्ट्र पातळीवर लोककलावंता करीता लोककवी वामनदादा कर्डक यांचे नांवाने महामंडळ स्थापन करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांचेकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजयभाऊ गायकवाड यांनी दिली. लोककलावंत सांस्कृतिक मंच, बुलढाणाच्या वतीने आयोजित ११ मार्च रोजी लोककलावंतांच्या झालेल्या भव्य मेळाव्यात उद्घाटन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शाहीर विष्णू शिंदे तर प्रमुख उपस्थितीत आनंद किर्तने नांदेड.शाहीर निवृत्ती घोंगटे, साहित्यिक सुरेश साबळे, शंकर महाराज येळगांवकर, अनिल जगताप, दिपक महाराज सावळे, शाहीर अॅड. विजयकुमार कस्तुरे, भीमकिर्तनकार दत्ता हिवाळे, शाहीर विक्रांत राजपुत, शाहीर निवृत्ती तायडे, विजय वानखडे, सुमित शेषराव गवई उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रारंभि महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली. जिल्हाभरातून आलेल्या गायन पाट्यांनी विविध कला अविष्कार सादर केला. सांस्कृतिक क्षत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याकलावंतांमध्ये युवा शाहीर विक्रांत सचिन सिंग राजपूत, सत्यशोधक किर्तनकार दत्ताजी हिवाळे, अॅड. विजयकुमार कस्तुरे, शाहीर समाधान इंगळे, उत्तम फुलकर, सुमित गवई, विजय वानखडे, निवृत्ती तायडे यांना विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात सुरेश साबळे, आनंद किर्तने, युवा शाहीर विक्रांत राजपुत यांच्या भाषणा नंतर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या कामाचा लेखा जोखा मांडला. प्रमुख भाषणात आमदार संजय गायकवाड यांनी कलावंतांच्या समस्यां बाबत चर्चा करतांना कलावंतांना मिळणाऱ्या अल्प मानधनात वाढ होणे गरजेचे आहे. कारण आपल्या बुलढाणा शहराला सांस्कृतिक कलेचा वारसा आहे तो जपण्यात यावा यासाठी मी प्रयत्न करीत राहील असे सांगितले. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक शाहीर डी. आर. इंगळे यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कला पथक मंडळ, भादोला आणि शाहीर शिवाजी लहाने यांच्या चमुने विशेष प्रयत्न केले. आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष अनिल हेलोडे यांनी केले. मेळाव्यासाठी जिल्हा भरातून विविध लोक कला सादर करणारे कलावंत तथा कला प्रेमी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 18