सार्थक फाउंडेशन तर्फे समाजसेवकांचा सत्कार!

Khozmaster
1 Min Read

 

देवेंद्र सिरसाट.नागपूर./स्थानिक सार्थक फाउंडेशन व त्यांच्या 32 सहयोगी संस्था च्या माध्यमातून दिनांक 31 मार्च 2023 ला सायंकाळी चार वाजता. (वनामती) वसंतराव नाईक स्मृती सभागृह,व्हीआयपी रोड, धरमपेठ, नागपूर येथे पंजाब राज्याचे राज्यपाल मा. श्री. बनवरीलाल पुरोहित यांच्या हस्ते नागपूर शहर व परिसरात आपल्या कार्यकर्तृत्वातून नावलौकिक प्राप्त करणारे व शहराचे नाव मोठे करणारे समाजसेवक डॉ. गिरीश गांधी, जन आक्रोशचे रवींद्र कासखेडीकर, आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट डॉ. अमित समर्थ, व प्रसिद्ध शेफ (पाक कलाकार ) विष्णू मनोहर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्याचे माजी मंत्री सुनील केदार हे भूषवतील तरं माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन सार्थक फाउंडेशनचे अध्यक्ष महेश बंग, सचिव विनोद चतुर्वेदी, कोषाध्यक्ष संजय पालीवाल, ट्रस्टी राजाभाऊ टाकसाळे,सुधीर बाहेती,पंकज महाजन,अजय मल यांनी केले आहे.

 

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *