सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत /भोकरदन तालुक्यातील अनवा येथील रहिवासी मौलाना हाफीज सय्यद जाकेर सय्यद खाजा यांना मस्जित मधे प्रवेश करुन काही तीन ते चार समाजकंटकांनी मारहाण करुन हल्ला करुन मौलाना यांची ब्लेड ने दाढी सुद्धा काढुन टाकण्यात आली या हल्ल्यामधे मौलाना यांची प्रकृती गंभीर आहे मौलाना यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) घाटी रुग्नालय येथे हलविण्यात आले आहे हा प्रकार पवित्र रमजान महिन्यामधे कुरान चे पठण करत असताना रात्रीच्या वेळेस घडला या हल्ले खोरांनी तोंडाला काळे कापड बांधुन कुनालाही ओळखु येऊ नये म्हनुण तोंड झाकलेले होते असे मौलाना यांनी सांगीतले या संदर्भामधे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक यांनी पारध पोलीस ठाणे येथे तक्रार दिली या अज्ञात हल्लेखोरांवरती लवकरात लवकर चौकशी करुन पकडुन त्वरीत योग्यती कडक कारवाई करण्यात यावी कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन पारध पोलीस ठाणे येथे देण्यात देण्यात आले
Users Today : 18