प्रतिनिधी सोयगाव /तालुक्यातील सावळदबारा येथील जेष्ठ महिला ग.भा.कमलाबाई नारायणराव देशमुख (वय ९१) वर्षे यांचे बुधवार रोजी दि.२९ मार्च २०२३ रात्री १०.५० वाजेच्या सुमारास निधन झाले.मरते समयी त्या ९१ वर्षाच्या होत्या त्यांच्या पार्थिवावर ३० मार्च २०२३ गुरुवार रोजी दुपारी एक वाजता सावळदबारा येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. आहे. याप्रसंगी सावळदबारासह परिसरातील व छत्रपती संभाजीनगर,अकोला, नांदुरा,वाशिम, सोयगाव, फत्तेपूरसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली, सुना,पुतणे सुन, नातवंडे, जावई असा खूप मोठा परिवार आहे.सावळदबारा येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव देशमुख व प्रभाकर देशमुख यांच्या त्या आई होत्या.
Users Today : 18