एकावर चाकूने पोटावर वार ; नंदुरबार येथील सिंधी कॉलनीतील घटना.

Khozmaster
1 Min Read

प्रविण चव्हाण नंदुरबार -:नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनीत सिंधी दिवस कार्यक्रमामध्ये नाचत असतांना धक्का लागल्याच्या कारणावरुन एकावर चाकूने पोटावर दोनवेळा भोसकून जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनीत सिंधी दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नाचत असतांना तरुन वासुदेव चंचलाणी (वय २८, रा. गणपती नगर, नंदुरबार ) यांचा हुम्पा राजपाल याला धक्का लागला. याचा राग आल्याने तरुन चंचलाणी यांना हुम्पा राजपाल, तुषार मंदाण, विजय राजपाल यांनी संगनमत करुन ओढून घेऊन गेले.तसेच तरुन चंचलाणी यांच्या पोटावर हुम्पा राजपाल याने शिवीगाळ करीत चाकूने पोटावर दोन वेळा वार करुन गंभीर दुखापत केली व तुषार मंदाण, विजय राजपाल यांनी हाताबुक्यांती मारहाण केली. याबाबत तरुन चंचलाणी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक देविदास सोनवणे करीत आहेत.

 

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *